छत्रपती संभाजीनगर

बांगडीसाठी तीन महिने फिरवले, मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी

CD
बांगडी मागताच सराफा व्यापारी गायब दुकान बंद, मोठ्या करण्यासाठी दिल्या होत्या बांगड्या, सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद छत्रपती संभाजीनगर, ता. १९ : बांगड्या मोठ्या करण्यासाठी सराफा व्यापऱ्याकडे दिल्या. परत मागितल्या तर एकच दिली. दुसऱ्या बांगडीसाठी तीन महिने चकरा मारायला लावल्या. वाद झाले, महिलेला शिवीगाळ झाली. त्यानंतर एक तारीख ठरली. त्या तारखेला महिला बांगडी आणायला गेली तर दुकान बंद होते. सराफा व्यापारी त्या परिसरातून गायब झाला होता. हा प्रकार शहरातील केळी बाजार परिसरात घडला. ४ लाख ६५ हजार रुपये किमतीची ३० ग्रॅमची बांगडी घेऊस पसार झाल्याप्रकरणी एस.एम. ज्वेलर्सच्या व्यापाऱ्यावर सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद झाला. घटनेनंतर या प्रकरणात संघमित्रा ऊर्फ संगीता रमेश शिरसाठ (५८, रा. जिजाऊ भोसले कॉलनी, जटवाडा रोड) यांनी फिर्याद दिली. शिरसाठ यांनी १६ नोव्हेंबर २०२२ मध्ये एस.एम. ज्वेलर्समधून सोन्याच्या दोन बांगड्या खरेदी केल्या होत्या. त्यांचे एकूण वजन ६० ग्रॅम होते. बांगड्या लहान होत असल्याने त्यांनी त्या मोठ्या करण्यासाठी १४ डिसेंबर २०२५ ला परत दुकानात दिल्या. त्यावेळी २३ डिसेंबरला बांगड्या परत देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, ठरलेल्या दिवशी बांगड्या मुंबईला घडविण्यासाठी पाठवल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जानेवारीतही बांगड्या परत मिळाल्या नाहीत. अखेर २० फेब्रुवारीला ३० ग्रॅम वजनाची एक बांगडी देण्यात आली. उर्वरित बांगडी नंतर देण्याचे सांगण्यात आले. ---- बांगडी मागताच वाद शिरसाठ या मेहुणे दिगंबर पाईकडे यांच्यासोबत उर्वरित बांगडी घेण्यासाठी १९ मार्चला पुन्हा दुकानात पोचल्या. त्यावेळी बांगडीचे पॉलिश अजून झाले नसल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तीन महिने उलटूनही बांगडी मिळाली नसल्याने शिरसाठ यांनी त्याच दिवशी बांगडी देण्याचा आग्रह धरला. यावर रौनक संचेती याने बांगडी देणार नसल्याचे सांगत पुन्हा दुकानात आल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ---- आश्वासन दिने अन् दुकान बंद करून गेले वादावादीनंतर संचेती यांनी उर्वरित ३० ग्रॅमची बांगडी २३ मार्चला देण्याचे दुकानाच्या लेटरहेडवर लिहून दिले होते. मात्र, त्या दिवशी तेथे गेले असता दुकान बंद दिसून आले. ३१ मार्चलाही दुकान बंद होते. याबाबत शिरसाठ यांनी परिसरात चौकशी केली, तेव्हा संचेती दुकान बंद करून गेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सिटी चौक पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास उपनिरीक्षक बुधा शिंदे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT