छत्रपती संभाजीनगर

जिंतूर तालुक्यात ​४० टक्के शेतकऱ्यांना शासनाच्या ५००० रुपये मातीपासून अजूनही वंचित : ​खरीप हातचे गेले, रब्बीची शाश्वती नाही शेतकऱ्यांना चिंता.

CD
जिंतूरला ​४०  टक्के शेतकरी वंचित ------------------- ​पाच हजारांची मदत जमा न झाल्याने चिंता; दुष्काळाच्या झळा असह्य -------------------- जिंतूर, ता.१५ (बातमीदार) ः शासनाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली मात्र अद्यापही तालुक्यातील ४० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हि रक्कम जमा झालेली नाही. शासनाने कागदावर दुष्काळ जाहीर केला, नुकसानीचे पंचनामेही आटोपले; मात्र प्रत्यक्ष भरपाई आणि पीकविम्याची हक्काची रक्कम मिळण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे तर दुसरीकडे, आगामी रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी जलस्त्रोतांत पाणीच नाही. त्यामुळे पुढील हंगामात तरी हाताशी चार पैसे मिळतील का, याची बळीराजाला खात्री नाही.​ दरवर्षी दिवाळीच्या काळात बाजारपेठांत खरेदीसाठी मोठी गर्दी उसळते. कपडे, किराणा, मिठाई, सजावटीचे साहित्य, फटाक्यांच्या दुकानांत खरेदीचा ओघ असतो. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीचा फटका बाजारपेठेलाही बसला. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या शेतकऱ्याच्या हातातच पैसा नसल्याने खरेदीवर मर्यादा आल्या. ग्रामीण अर्थव्यवस्था मंदावल्याने गावातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचेही कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांसमोर वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात भरीव मदत, पीकविम्यातून तातडीची भरपाई, कर्जाच्या ओझ्यातून संपूर्ण मुक्ती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दुष्काळाची सर्वात मोठी झळ भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना सोसावी लागत आहे. शेतात कामच नसल्याने मजुरांचा प्रश्न बिकट आहे. काम करून रोजची चूल पेटवणाऱ्या कुटुंबांसमोर आता दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा आहे. ------------ ((​कोट))) तालुक्यात शेतकरी संख्या ९३ हजार ७२२ आहे. त्यापैकी ८२ हजार००४ शेतकऱ्यांची ५००० रुपये अनुदानाची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर ११,६८२ शेतकऱ्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे नाकारण्यात आले. -अर्जुन आघाव, महसूल सहायक, जिंतूर ((कोट))) दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ५००० रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली परंतु तालुक्यातील ९३ हजारपैकी ५७ हजार शेतकऱ्यांच्याच खात्यावर पैसे जमा झाले. तर उर्वरीत शेतकरी मदतीपासून वंचित असून तातडीने अनुदान वर्ग करावे. -इरशाद पाशा, पिंपरीकर ---------- ((कोट))) ​महाराष्ट्र शासनाने दिवाळी साजरी करण्यासाठी पाच हजार रुपयाचे अनुदान जाहीर केले परंतु अद्यापही माझ्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही. दुष्काळाच्या झळा असह्य होत असून तातडीने अनुदान द्यावे. -कमल चव्हाण, शेतकरी सावरगाव तांडा ता. जिंतूर. ----- ((कोट))) पैसे डिबीटीमार्फत थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतात. ते आम्हाला समजत नाही. उपलब्ध सर्व गावांना अप्रोहल दिले आहे.ज्या शेतकऱ्यांचे अनुदान जमा झाले नाही त्यांनी तहसील कार्यालयात तक्रार करावी. -शीतल कच्छवे, तहसीलदार जिंतूर. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akwan: बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती; ‘अक्वान’मुळे मुसळधार पावसाचा इशारा

Pune Nashik Highway: चंदनापुरी घाटात आठ वाहनांचा अपघात ;महामार्गावर वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Ahilyanagar News: कारची सायकलला धडक; दोन मुलांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : "छठपूजेचा अतिरेक नको, हा महाराष्ट्र आहे"; संजय राऊतांच्या इशाऱ्यावर भाजपचे नेते नवनाथ बन यांचा पलटवार

Anna Hazare : नशामुक्त भारत अभियान तळागाळात पोहोचविण्याबाबत अण्णा हजारे आणि सुमित सिंह यांच्यात राळेगण सिद्धीत सखोल चर्चा

SCROLL FOR NEXT