छत्रपती संभाजीनगर

जाहीर लिलावाला फाटा; कनेरगाव उपबाजारात व्यापाऱ्यांची मनमानी

CD
लिलावाला फाटा; कनेरगाव उपबाजारात व्यापाऱ्यांची मनमानी चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा; जिल्हा प्रशासनास दिले निवेदन हिंगोली : तालुक्यातील कनेरगाव नाका येथील उपबाजार समितीत शेतमालाच्या खरेदी-विक्री प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करीत काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जाहीर लिलाव न घेताच व्यापाऱ्यांकडून परस्पर शेतमालाची खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार निवेदनाद्वारे केली आहे. कनेरगाव नाका उपबाजार समितीत शेतमालाची खरेदी ‘हाराशी’ अर्थात, जाहीर लिलाव पद्धतीने होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया राबविल्यास व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन शेतमालाला योग्य भाव मिळू शकतो. मात्र, सध्या मनमानी पद्धतीने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच सार्वजनिक वापरासाठी असलेल्या ओट्यांवर व्यापाऱ्यांनी अनधिकृत कब्जा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बाजार समितीवर प्रशासक नियुक्त झाल्यापासूनचे विशेष लेखापरीक्षण करावे, दैनंदिन खर्च, खरेदी-विक्रीचे दर आणि व्यापारनिहाय व्यवहार सार्वजनिक करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सीसीटीव्ही फुटेज, आवक-जावक रजिस्टर, लिलाव नोंदवही आणि वजन पावत्यांचे अभिलेख सुरक्षित ठेवावेत. अनधिकृत अतिक्रमण हटवून लिलाव, बोली आणि अंतिम विक्री दराच्या लेखी व डिजिटल नोंदी जाहीर कराव्यात, अशी मागणीही केली आहे. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी समिती स्थापन करावी. अन्यथा, २५ नोव्हेंबरपासून आंदोलन छेडण्याचा इशारा ॲड. प्रशांत बोडखे, हरिदास वायचाळ, विठ्ठल वायचाळ, जनार्दन वायचाळ, किसन वायचाळ आदींनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JEE Advanced 2027 ची तारीख जाहीर; 23 मे रोजी होणार परीक्षा, IIT दिल्लीकडे आयोजनाची जबाबदारी

रेल्वे प्रवासात बदल! आता ट्रेनमधील RAC सुविधा बंद होणार? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

Ramayana Box Office : अवघ्या ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास! 'रामायण'ची १००० कोटींच्या क्लबमध्ये दणदणीत एन्ट्री; आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांची यादी पाहा!

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

SCROLL FOR NEXT