Kojagiri Purnima 2023  esakal
छत्रपती संभाजीनगर

Kojagiri Purnima 2023 : कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहणामुळे पिता येणार नाही दुधाचा प्रसाद?

यंदा कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खंडग्रास चंद्रग्रहण देखील असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kojagiri Purnima 2023 : आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे घटस्थापनेपासून शरद ऋतूची सुरुवात झाली. येणाऱ्या शनिवारी (ता.२८) शरद पौर्णिमा अर्थात कोजागरी पौर्णिमेच्या रात्री शरदाचं चांदणं अनुभवता येणार आहे. या रात्री चंद्राला आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवता येणार आहे. परंतु, या रात्री चंद्रग्रहण असल्याने या दुधाचा प्रसाद मात्र, प्राशन करता येणार नाही.

कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागून घरोघरी पूजा केली जाते. रात्री चंद्र माथ्यावर आल्यानंतर त्याचे दुधात प्रतिबिंब बघून नंतर ते प्राशन केले जाते. कोजागिरी पौर्णिमेविषयी नागेश मूर्तिकर गुरुजी सांगतात, या कोजागिरीच्या मध्यरात्री ऐरावतारूढ इंद्र आणि लक्ष्मी यांची पूजा करावी दोन्ही संपत्तीकारक देवता आहेत.

कोजागिरीच्या मध्यरात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत ती ‘ को जागरती ’ असे पूजेच्या उद्देशाने कोण जागत आहे? असे म्हणत असते जे जागे असतात, पूजन करत असतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तिथे स्थिरावते. २८/२९ ऑक्टोबरच्या रात्री १:०५ ते २:२३ या कालावधीत खंडग्रास चंद्र ग्रहण दिसणार आहे.  दुपारी ३:१४ ला वेध लागणार असल्याचे गुरूजींनी सांगितले.

भगवान श्रीकृष्ण यांची महारास क्रीडा शरद पौर्णिमेपर्यंत चालली आणि शीतल प्रकाश देणारा चंद्र हा त्याचा साक्षीदार होता. त्यामुळे, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूजन करून आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवला जात असल्याची प्रथा रूढ झाल्याचे रामकृष्ण बारहाते गुरुजी यांनी सांगितले.

दुधात का पाहावे चंद्राचे प्रतिबिंब ?

कोजागिरी पौर्णिमेला चंद्र मध्यावर आल्यानंतर त्याचे प्रतिबिंब आटवलेल्या दुधात पाहतात आणि नंतर तो प्रसाद मानून प्राशन करतात. या मागची भूमिका विशद करताना श्री. बारहाते गुरुजी म्हणाले, वर्षभरात चंद्र शरद पौर्णिमेच्या दिवशी १६ कलागुणांनी प्रतिबिंबित होत असतो. त्याची या रात्री बाहेर पडणारी किरणे अमृततुल्य असतात.

ती किरणे पडलेले दूध अमृततुल्य होऊन अमृतप्राशनाचे भक्तांना फळ मिळते. अनेक प्रकारच्या व्याधी नष्ट करण्याचे सामर्थ्य त्या दुधात उत्पन्न होते, म्हणून दूध प्राशन केले जाते अशी त्यामागची भावना आहे.

चंद्र येतो पृथ्वीच्या जवळ

एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास  औंधकर म्हणाले, ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये चंद्र आणि पृथ्वीतील अंतर कमी होते. पौर्णिमेला चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर सरासरीपेक्षा खूप कमी झालेले असते.

या रात्री चंद्राचे आकारमान वाढते आणि पृथ्वीवर अधिक प्रकाश पडतो. पावसाळा संपल्याने वातावरणातील धुलीकणाचे प्रमाण कमी झालेले असते. चंद्र मध्यावर आल्यानंतर त्याची किरणे सरळ रेषेत पडतात. त्याचे तेज वाढलेले असते त्याची शितलता अनुभवता यावी, यासाठी रात्री जागरण केले जात असावे.

दुधाचा प्रसाद घ्यावा का?

धर्म शास्त्रानुसार ग्रहण काळात पूजन करता येते. त्यामुळे सर्वांनी दरवर्षीप्रमाणे इंद्र, चंद्र, लक्ष्मी यांचे पूजन करावे आणि आटवलेल्या दुधाचा नैवेद्यही दाखवावा. मात्र, तो प्रसाद प्राशन करता येणार नाही. दुसऱ्या दिवशी हा प्रसाद प्राशन करता येईल. परंतु, नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र किंवा दर्भ ठेवून चंद्राला नैवेद्य दाखवावा म्हणजे दोष लागणार नाही, असे श्री. बारहाते गुरुजी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

Asia Cup 2025: 'माणसाच्या जीवाची किंमत शून्य; IND vs PAK सामना पाहाणार नाही', माजी क्रिकेटपटू बरसला

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Gaza City: ‘गाझा सिटी’ला उपासमारीचा विळखा! पाच लाख जणांना धोका; सप्टेंबरअखेरपर्यंत समस्या तीव्र होणार

SCROLL FOR NEXT