नागरी सुविधांसाठी प्रशासकीय मान्यता
------------
तीन कोटींतून होणार कुंभारीत रस्ते, विद्युतीकरण
मानवत, ता.२१(बातमीदार): तालुक्यातील कुंभारी गावातील पुरामुळे पुनर्वसित झालेल्या नागरिकांसाठी विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने कुंभारी येथील नागरी सुविधा कामांसाठी २ कोटी ९९ लाख ९७ हजारांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली.
२१ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार कुंभारी गावासाठी तीन प्रमुख नागरी सुविधा कामांचा समावेश करण्यात आला आहे. यात कुंभारी फाटा ते कुंभारी गाव सी.सी.रस्त्यासाठी ९९.९९ लाख, कुंभारी गाव ते जगदंबा मंदिरापर्यंत सी.सी. रस्त्यासाठी ९९.९९ लाख, विद्युतीकरणासाठी ९९.९९ लाख अशा एकूण २९९.९७ लाखांच्या कामांना मान्यता देण्यात आली. पुरामुळे पुनर्वसित झालेल्या गावात आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने ही प्रशासकीय मान्यता दिली. मिळालेल्या कामांची निविदा प्रक्रिया तत्काळ सुरू करून कार्यारंभ आदेश देण्यात यावेत. ही कामे १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावीत, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या कामांमुळे कुंभारी येथील पुनर्वसित नागरिकांना दळणवळणासाठी पक्के रस्ते तसेच विद्युत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आमदार राजेश विटेकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दत्तराव जाधव यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
((कोट)))
कुंभारी गावातील पुरामुळे पुनर्वसित झालेल्या नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. रस्ते व विद्युतीकरणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
-दत्तराव जाधव, अध्यक्ष,
खरेदी विक्री संघ, मानवत
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.