Dhangar Reservation Meeting
Dhangar Reservation Meeting 
छत्रपती संभाजीनगर

धनगर आरक्षणासाठी मंत्र्यांच्या घरात सोडणार मेंढरे

प्रकाश बनकर

औरंगाबाद : धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची अंमलबजाणी करण्यात आलेली नाही. अनेक वर्षांपासून हा प्रश्‍न भिजत ठेवण्यात आलेला आहे. यामुळे धनगर समाजातर्फे आरक्षणासाठी आता आक्रमक भूमिका घेणार आहे. भाजपच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्‍न तात्काळ सोडविण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. यावर काही झाले नाही.

या सरकारनेही या प्रश्‍नाकडे लक्ष न दिल्यास मंत्र्यांच्या घरात मेंढरे सोडणार असल्याचा इशारा सोमवारी (ता.२१) यशवंत सेनेतर्फे देण्यात आला आहे.
यशवंत सेनेतर्फे आरक्षणासंदर्भात गजानन महाराज मंदिर परिसरात आज बैठक घेण्यात आली. यात आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यात आली. यात भाजप सरकारने कोट्यावधी धनगर समाजाचा विश्‍वासघात केला आहे.

केवळ विविध योजनांसाठी भाजपने नुसती परिपत्रके काढली. त्यांची अंमलबाजावणी करण्यात आलेली नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारने तात्काळ पूर्ण करावा. समाजाची एसटी प्रवर्गात अमंलबाजावणी करावीत, यासाठी एकदिवसीय विशेष कल्याणकारी योजनासाठी एक हजार कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून द्यावा, असे न केल्यास सर्व मंत्र्यांच्या घरात मेंढरे सोडण्यात येईल, असेही या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर, रवि वैद्य, विकास सुसर, सुरेश डोळे, रंजित खांडेकर, अशोक भावले, सखाराम भोजने, तुकाराम पाटील वायाळ, दीपक महानवर, कैलास रिठे, विष्णू कोरडे, गणेश सातपुते, निर्मळ विजय, साडू बनसोडे, पोपट गवरे, अमृत पारधे, ताराचंद्र पवार, प्रमोद खाडे, दत्ता नवले, भगवान शिंदे, ईश्‍वर शिंदे, नवनाथ सातपुते, बाळकृष्ण शेवते आदी उपस्थित होते.



संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT