छत्रपती संभाजीनगर

दुभाजकांची होतेय ‘कचराकुंडी’; तब्बल आठ ट्रॅक्टर कचरा जमा

CD
LTR26B15645, LTR26B15646, LTR26B15647 लातूर : गरुड चौक ते स्वामी विवेकानंद चौक मार्गावर रविवारी झालेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचे सदस्य. (दुसऱ्या छायाचित्रात) स्वच्छता मोहिमेनंतर जमा झालेला कचरा. (तिसऱ्या छायाचित्रात) ट्रॅक्टरमध्ये भरून कचऱ्याची विल्हेवाट लावताना सदस्य. ------------- दुभाजकातून काढला आठ ट्रॉली कचरा --- लातुरात गरुड चौक ते स्वामी विवेकानंद चौक मार्गावर स्वच्छता मोहीम --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १५ : शहरातील रस्त्यांच्या मधोमध असलेल्या दुभाजकांना अक्षरश: ‘कचराकुंडी’चे स्वरूप आले आहे. येता-जाता नागरिकांकडून येथे कचरा फेकला जात आहे. त्यामुळे शहरात ठिकाठिकाणच्या दुभाजकांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शहरातील गरुड चौक ते स्वामी विवेकानंद चौक मार्गावरील दुभाजक स्वच्छ करून आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनमधील पर्यावरणप्रेमींनी चक्क आठ ट्रॅक्टर ट्रॉली कचरा रविवारी (ता. १५) बाहेर काढला. आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन सदस्यांनी शहरात १७० वी स्वच्छता मोहीम गरुड चौक ते स्वामी विवेकानंद चौक भागात राबवली. येथील दुभाजकांमध्ये अनेक महिन्यांपासून स्वच्छता झालेली नाही असे आढळून आले. येथील कचऱ्याचे फोटो काढून प्रशासनाला माहिती देण्यात आली होती; परंतु प्रशासनाकडून काहीही कारवाई न झाल्यामुळे ‘आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन’च्या सदस्यांनी या भागात स्वच्छता मोहीम राबवली. या दुभाजकांमध्ये परिसरातील ऑटोमोबाइल्स दुकानदारांनी भंगार साहित्य, आजूबाजूच्या घरातील लोकांनी कॅरीबॅगमध्ये बांधून घरातील खरकटे अन्नधान्य, प्लॅस्टिक बाटल्या, दिवाळी पूजनाचे साहित्य, केळीची पाने, नारळाची पाने, बांधकामाचे साहित्य, तुटलेले फर्निचर, घरातील शिल्लक साहित्य, कुजलेलं अन्न अशा प्रकारचा कचरा टाकला होता. आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनमधील १५ जणांच्या सदस्यांनी हा कचरा बाहेर काढून दुभाजक स्वच्छ केले. रविवारी जवळपास साडेतीन तास चाललेल्या या स्वच्छता मोहिमेमध्ये अंदाजे आठ ट्रॅक्टर केरकचरा, भंगार साहित्य, प्लॅस्टिक जमा झाले, असे आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचे डॉ. पवन लड्डा यांनी सांगितले. या मोहिमेसाठी डॉ. पवन लड्डा, दयाराम सुडे, रवी तोंडारे, सुवर्णा महाजन, डॉ. संगीता शिंदे, किरण चिंते, संस्कृती पिसाळ, डॉ. ज्योतीराम पिसाळ, ओमप्रकाश शेळके, आकाश पेठकर यांच्यासह अन्य सदस्यांनी पुढाकार घेतला होता. --- ((कोट)) नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. घंटागाडीमध्येच कचरा टाकावा. घंटागाडी येत नसेल, तर संबंधित घंटागाडी प्रमुख, संबंधित स्वच्छता अधिकारी, नगरसेवक, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांना दूरध्वनी करून तक्रार नोंदवावी. - दयाराम सुडे, आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन

रुपाली चाकणकरांनी दिला कायदेशीर कारवाईचा इशारा; दिपाली सय्यद म्हणाल्या, 'हे किती हास्यास्पद!'

उद्यापासून ६ राशींचं नशीब चमकणार! आयुष्यात येणार आनंदाचे दिवस, धनलाभाचेही संकेत

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

ENG vs AUS, 2nd ODI: इंग्लंडचा पलटवार! गस ऍटकिन्सनच्या माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव कोलमडला, तब्बल १३५ धावांनी पराभव

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT