छत्रपती संभाजीनगर

माझं घर प्रकल्पासाठी लातुरकरांचा मदतीचा हात

CD
LTR26B15618 लातूर : दिवाळीनिमित्ताने विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या सहभागातून माझं घर प्रकल्पाला दिलेली मदत. --- माझं घर प्रकल्पासाठी लातूरकरांचा मदतीचा हात ------ १,३३,५५९ रुपयांच्या निधीतून चार महिने पुरेल इतके साहित्य सुपूर्द -- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता.१३ : काही माणसं इतरांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पेरून दिवाळीचा खरा अर्थ जिवंत ठेवतात. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलवणारी माणसं हीच खऱ्या अर्थाने माणुसकीची श्रीमंती जपणारी असतात. यंदाच्या दिवाळीत लातूर जिल्ह्यातील शिक्षक मित्रमंडळींसह विविध क्षेत्रांतील संवेदनशील व्यक्तींनी असाच माणुसकीचा दीपोत्सव साकारला. माणूस प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या निराधार, अनाथ आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या निवास व संगोपनासाठीच्या ‘माझं घर’ या निवासी प्रकल्पाला दीपावलीनिमित्त मदतीचा भक्कम आधार दिला. दिवाळीनिमित्ताने शिक्षक मित्रमंडळींच्या पुढाकारातून आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या सहभागातून तब्बल १२७ देणगीदारांनी एकत्र येत एक लाख ३३ हजार ५५९ रुपयांचा निधी उभारला. यातून आश्रमातील विद्यार्थ्यांना किमान चार महिने पुरेल इतके अन्नधान्य, किराणा साहित्य, मसाले, स्वयंपाकासाठी आवश्यक वस्तू आणि दैनंदिन वापरातील स्वच्छतेच्या वस्तू भेट देण्यात आल्या. वांगेवाडी (ता. औसा) येथे शिक्षणापासून दूर असलेल्या निराधार आणि वंचित घटकांतील मुला-मुलींसाठी माझं घर हा निवासी प्रकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद झरे आणि त्यांच्या पत्नी संगीता झरे यांच्या संकल्पनेतून सुरू असून लोकसहभाग आणि स्वावलंबनाच्या बळावर कार्यरत आहे. येथे अन्नधान्य व किराणा साहित्य सुपूर्द करण्याचा स्नेहसोहळा झरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी जगन्नाथ मिरकले, डॉ. लक्ष्मण दावणकर, चंद्रकांत भोजने, निशिकांत मिरकले, जयराज सोदले, अनिल वाघमारे, ज्ञानदेव कांबळे, विजयकुमार गव्हाणे, संतोष कासले,माधव चिलमे, दयानंद गोरे, सोपान हेळंबे, बालाजी सर्जे साईनाथ माने, अनुराग सुगरे, शोभा माने, अनिता खडके, संगीता पवार, सुनंदा मिरकले, उषा मिरकले, देवांशी मिरकले उपस्थित होते. - प्रकल्पात ७५ विद्यार्थी वास्तव्यास डोंबारी, पारधी, मसनजोगी, घिसाडी अशा समाजघटकांतील तसेच अनाथ मुले-मुली, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील बालके तसेच ऊसतोड कामगारांची मुले यांना शिक्षणाची संधी, निवासाची सुरक्षितता, सुसंस्कारांचे बाळकडू मिळावे, या हेतूने हा प्रकल्प उभा आहे. येथे सध्या ५० मुले आणि २५ मुली असे एकूण ७५ विद्यार्थी वास्तव्यास असून, त्यांच्या निवास, भोजन, संगोपन आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी प्रकल्पाच्या माध्यमातून पार पाडली जाते. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Winter Skincare Tips: हिवाळ्यात चेहरा काळपट पडू नये म्हणून काय करावं? त्वचेची चमक टिकवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स

IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'

Latest Marathi News Live Update: उदापूर येथे सुपर कॅरी गाडीची दुचाकीला धडक; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

India Export: भारताच्या निर्यातीत 30 टक्क्यांची मोठी झेप; ऑक्टोबरमध्ये 8.47 लाख कोटींची निर्यात, व्यापार तुटीतही घट

'आग ये सुंदरा...तुझा माझा गो शोभल जोडा' आगरी कोळी गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT