जिल्ह्यातील १० केंद्रांवर उद्या मतदान
----
लातूर जिल्हा बँक निवडणूक; केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १३ : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. १५) मतदान होणार आहे. जिल्ह्यातील औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, अहमदपूर, चाकूर व जळकोट येथील तहसील कार्यालयांमध्ये तसेच उदगीर येथील प्रशासकीय भवन इमारतीचा तळमजला येथे अशा एकूण दहा मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी मतदान केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे सहकार पॅनल आणि महायुतीचे परिवर्तन पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. ही निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निर्गमित केलेल्या आदेशानुसार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सहापासून ते मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्रांच्या ठिकाणापासून २०० मीटरच्या परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या २०० मीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये, मंडप आणि सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, सर्व प्रकारचे फेरीवाले, खासगी वाहने तसेच मोबाइल, वायरलेस सेट व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच मतदान केंद्रांच्या परिसरात ध्वनिक्षेपकांचा वापर करणे, वाद्य वाजविणे आणि मिरवणुका काढण्यासही प्रतिबंध करण्यात आले आहे. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले असून त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला वैध ओळखपत्राशिवाय मतदान केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगण्यात आले.
---
ही आहेत मतदान केंद्र
लातूर : तहसील कार्यालय (महसूल हॉल)
औसा : तहसील कार्यालय (मीटिंग हॉल)
निलंगा : तहसील कार्यालय (महसूल हॉल)
उदगीर : प्रशासकीय भवन (खोली क्र. २)
देवणी : तहसील कार्यालय (सभागृह)
जळकोट : तहसील कार्यालय (महसूल हॉल)
शिरूर अनंतपाळ : तहसील कार्यालय (व्हीसी कक्ष)
अहमदपूर : तहसील कार्यालय (महसूल हॉल)
रेणापूर : तहसील कार्यालय (महसूल हॉल)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.