wine shop wine shop
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये मद्य विक्रेत्यांचा धुमाकूळ; होम डिलेव्हरी ऐवजी थेट विक्री

प्रशासनाने मोठी कारवाई करत पाच मद्य विक्रेत्यांचे केले परवाने रद्द केले आहेत

प्रकाश बनकर

औरंगाबाद: होम डिलेव्हरी ऐवजी थेट मद्य विक्री करणाऱ्यांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे दोन दिवसापासून कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी (ता.२४) पाच मद्य विक्रेत्यांचे परवाने रद्दची कारवाई करण्यात आली. यामध्ये टि.व्ही सेंटर जळगाव रोडवरील वाईन शॉपसह चार मद्य विक्रेते आणि चौका येथील देशी दारू विक्रेत्याचा सामावेश असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल. कदम यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत एकूण दहा विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये शुक्रवारी (ता. २३) मोंढा नाका, जुना मोंढा यासह कांचनवाडी येथील मद्य विक्री करणारे व देशी दारूच्या दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. शनिवारी (ता. २४) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल कदम यांनी स्वतः रस्त्यावर उतरून काही वाईन शॉप चालकांवर कारवाई केली आहे.

होम डिलेव्हरीची परवानगी देण्यात आली असतानाही अनेकांनी थेट मद्य विक्री केली. त्यामुळेच राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडमध्ये आले आहे. परवानाधारक वाईन शॉप चालकांनी कोरोनाचे नियम पाळणे, शॉप समोर गर्दी जमा न होऊ देण्यांच्या स्पष्ट सूचना असतानाही त्यांनी नियम तोडले. कारवाई अशाच प्रकारे सुरु राहील अशी माहिती एस. एल. कदम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Poland Defense: पोलंडमध्ये फ्रान्सची लढाऊ विमाने तैनात

Navaratri 2025: यंदा नवरात्रीत क्लासी ‘स्टाइल स्टेटमेंट’ महिलांना खुणावताहेत वेगवेगळ्या रंगांच्या साड्या अन् घागरा

Chinchwad Crime : चिंचवडमध्ये टेम्पो चालकाला लुटले; गुन्हेगारांना अटक

हॉस्टेलमध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात मित्रांनी घातलं फेविक्विक, ८ जणांना रुग्णालयात केलं दाखल

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

SCROLL FOR NEXT