छत्रपती संभाजीनगर

पशुधन विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग; मात्र ओपन प्रवर्गाचा कोटा संपल्याने शेतकरी अडचणीत

CD
विमा काढायचा, पण कोटाच संपला! खुल्या प्रवर्गाचा पशुधन विमा कोटा दिवाळीपूर्वीच संपला; खासगी विमा परवडेना केदारखेडा, ता.१३ (बातमीदार) : शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पशुधन विमा योजना राबविण्यात येत आहे. जनावर अचानक दगावणे, अपघात किंवा अन्य कारणांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळावे, यासाठी पशुपालक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, पशुधन विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असतानाच शासनाने निर्धारित केलेला खुल्या (ओपन) प्रवर्गातील विम्याचा कोटा दिवाळीपूर्वीच संपला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विमा काढता येत नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या पशुधन विमा योजनेमुळे कमी खर्चात जनावरांना विमा संरक्षण मिळण्याची संधी पशुपालकांना उपलब्ध झाली आहे. खासगी विमा कंपनीकडून एका पशुधनाचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे पाच हजार रुपये खर्च करावे लागतात. याउलट, शासनाच्या योजनेत एका पशुधनासाठी शेतकऱ्यांना सुमारे साडेचारशे रुपये भरावे लागतात. उर्वरित विमा हप्ता शासनाकडून निर्धारित नियमानुसार विमा कंपनीला अदा केला जातो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मर्यादित परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे. मात्र, शासनाकडून प्रवर्गनिहाय विम्याचा कोटा निश्चित करण्यात आल्याने खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. दिवाळीपूर्वीच या प्रवर्गाचा निर्धारित कोटा संपल्याने नव्याने पशुधन विमा काढू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (एससी-एसटी) प्रवर्गातील विम्याचा कोटा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या कोट्यातून विमा काढण्यासाठी संबंधित प्रवर्गातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद तुलनेने कमी असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पशुधन विमा योजनेचा लाभ घेण्याची शेतकऱ्यांची इच्छा असतानाच कोटा संपल्याने अनेक पशुपालकांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. खासगी विमा काढणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शेतकरी शासनाच्या योजनेतील नव्या कोट्याच्या प्रतीक्षेत आहेत. ................. नवीन कोटा कधी? शासनाने पशुपालकांच्या हितासाठी राबविलेल्या या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील पशुधन विम्याचा कोटा तातडीने वाढवून नव्याने मंजूर करावा, अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाकडून नवीन कोटा कधी उपलब्ध होणार आणि शेतकऱ्यांना पुन्हा पशुधनाचा विमा काढता येणार का, याकडे पशुपालकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Merger Politics : "भाजपला दूर ठेवून आम्ही पुढे कसे जाणार?"; दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणातील सर्वात मोठा पेच उघड!

मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प होताच २०२४ च्या 'त्या' घटनेची आठवण; एका अपडेटनं जगभर उडवला होता गोंधळ

Latest Marathi News Live Update: मेहत्रे वस्ती येथील प्लास्टिक कंपनीला भीषण आग

Winter Skincare Tips: हिवाळ्यात चेहरा काळपट पडू नये म्हणून काय करावं? त्वचेची चमक टिकवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स

IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'

SCROLL FOR NEXT