lovers commit sucide crime police social media instagram Chhatrapati Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : रेल्वेगाडीसमोर उडी घेत प्रेमाचा शेवट

प्रियकराचा मृत्यू तर प्रेयसी जखमी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दोघेही नात्यातीलच...इन्स्टाग्रामवरून मैत्री वाढली... मैत्रीतून प्रेम बहरले. एकीकडे तो एमपीएससीची तयारी करत असल्याने करिअर स्थिर झाल्यावर करून लग्न करूया म्हणत असे, मात्र दुसरीकडे कुटुंबीयांनी तिचे महिनाभरापूर्वीच हात पिवळे केले.

लग्नानंतर ती ठाणे येथे सासरी गेली. त्यानंतरही दोघांचा फोनवर संपर्क होत होता. तो तिच्यासाठी ठाण्याला गेला. ती सासरच्यांना चुकवून पळून त्याच्यासोबत ठाण्याहून पुण्याला आली. तिथून ते छत्रपती संभाजीनगरला आले अन् दोघांनीही मंगळवारी (ता.२८) रात्री एकनाथनगर भागात धावत्या रेल्वेसमोर उडी घेत प्रेमाचा शेवट केला.

यात प्रियकर ठार झाला तर प्रेयसी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उमेश मोहन तारू (२३, रा. चांगदेव, जि. जळगाव) असे मृत प्रियकराचे नाव आहे. दरम्यान, सून बेपत्ता झाल्याने तिचा सासरच्या मंडळींनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

ही रेल्वे जाऊ दे

उमेश आणि ती एकनाथनगराकडे रेल्वेरुळावर जाऊन गप्पा मारत बसले. रेल्वेसमोर उडी घेऊन प्रेमाचा शेवट करायचे हे त्यांचे ठरलेले होते; परंतु बोलणे अपूर्ण असतानाच रेल्वेगाडी आली. त्यामुळे ‘ही रेल्वे जाऊ दे, दुसरी येईल तिच्यासमोर उडी घेऊ’,’ असे उमेश म्हणाला.

मनसोक्त गप्पा मारल्यानंतर साडेनऊ ते पावणेदहादरम्यान त्यांनी धावत्या रेल्वेसमोर दोघांनी उडी घेतली. यात उमेशचा मृत्यू झाला तर प्रेयसी गंभीर जखमी झाली. ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर डायल ११२ चे कर्मचारी तसेच अंमलदार विठ्ठल कऱ्हाळे यांनी तत्काळ धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT