छत्रपती संभाजीनगर

शेतातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ

CD
शेतातूनच एकनाथ शिंदेंना दाखविले करपलेले पीक पालकमंत्र्यांकडून पाहणी; व्हिडिओ कॉलद्वारे उपमुख्यमंत्र्यांशी साधला संपर्क ----- धाराशिव, ता. १७ : पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, कोणत्याही परिस्थितीत त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक यांनी गुरुवारी (ता. १७) धाराशिव तालुक्यातील खेड येथील शेतकरी ज्ञानेश्वर टकले यांच्या शेताला भेट देऊन करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. टकले यांनी १०० टक्के पीक हातचे गेल्याची व्यथा मांडत शासनाने भरीव आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. ----- उपमुख्यमंत्र्यांना दाखविले नुकसान नुकसानीचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यासाठी सरनाईक यांनी शेतातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त सोयाबीनचे पीक प्रत्यक्ष दाखविले. शिंदे यांनी शेतकरी ज्ञानेश्वर टकले तसेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, निश्चितपणे मदत केली जाईल, असा दिलासा त्यांनी दिला. तसेच जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांना नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. दौऱ्यात पालकमंत्र्यांनी वासुदेव मेटे यांच्या नुकसानग्रस्त उसाची पाहणी केली. यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. ----- OSM26B07023 धाराशिव : तालुक्यातील खेड येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्री प्रताप सरनाईक. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार व अन्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

Manoj Jarange Patil: "विषय फिट बसला!" 58 लाख नोंदींवर जरांगेंचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT