छत्रपती संभाजीनगर

'महात्मा गांधीजींवर सिनेमा इंडस्ट्रीचे प्रेम'!आंतरराष्ट्रीय अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवात प्रकाश मगदूम यांचे गौरवोद्गार

चित्रपट न आवडणाऱ्या या माणसावर सिनेमा इंडस्ट्रीने इतके प्रेम केले, की जगातील सर्वाधिक चित्रीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये गांधींचे नाव घेतले जाते’’, असे गौरवोद्गार केंद्र शासन - पीआयबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश मगदूम यांनी शनिवारी (ता. सहा) काढले.

सकाळ डिजिटल टीम

Internation Ajintha Ellora Film Festival: ‘‘दक्षिण आफ्रिकेतील १९१२ मधील आंदोलन असो की १९३० सालची दांडी यात्रा. महात्मा गांधी यांची सर्व आंदोलने गाजली. चित्रपट न आवडणाऱ्या या माणसावर सिनेमा इंडस्ट्रीने इतके प्रेम केले, की जगातील सर्वाधिक चित्रीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये गांधींचे नाव घेतले जाते’’, असे गौरवोद्गार केंद्र शासन - पीआयबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश मगदूम यांनी शनिवारी (ता. सहा) काढले.

नवव्या आंतरराष्ट्रीय अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवात ‘गांधी आणि सिनेमा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. मगदूम म्हणाले, ‘‘आपण महात्मा गांधी यांना एका विशिष्ट भूमिकेत पाहिलेले आहे. आपण त्यांना जेव्हा सिनेमाशी जोडतो तेव्हा एक आगळे-वेगळे समीकरण तयार होते.

हलत्या-बोलत्या चित्रांचे जे सिनेमा नावाचे माध्यम आहे. त्यामध्ये या माणसाविषयीचे कुतूहल काही कमी होत नाही. गंमत म्हणजे, गांधींना सिनेमा आवडत नव्हता. सिनेमा म्हणजे केवळ वेळ वाया घालवण्याची गोष्ट आहे, त्यापासून काहीही फायदा होत नाही. उलट नुकसानच होते, असे महात्मा गांधी यांचे मत होते आणि त्यावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले.

पण, तरीही महात्मा गांधी यांना कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. १९१२ मध्ये त्यांचा पहिला स्क्रीन प्रेझेंस दिसला. त्यांचा चरख्याला गतीची उपमा मिळाली. दांडी यात्रेची दखल आजही घेतली जाते. आपण सध्या न्यूज रूल्सच्या माध्यमातून घटना बघतो. गांधी यांच्या जीवनावर खूप साऱ्या न्यूज रील्स बनवल्या गेल्या. १९२७ साली महात्मा गांधी यांनी आपली पहिली मुलाखत दिली. (Latest Marathi News)

या मुलाखतीच्या बातम्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’सह अनेक वृत्तपत्रांनी छापल्या. गांधींचे जीवन अनेकदा चमत्कारी गोष्टींनी भरलेले असायचे. त्यामुळे त्यातील नाट्याकडे चित्रपट दिग्दर्शकांचे आकर्षित होणे स्वाभाविक होते. गांधीजींची मूल्ये आणि तत्त्वे यावर विविध भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या कालावधीमध्ये चित्रपट बनले. त्यांच्यावर चरित्रपट बनले. गांधीचे पात्र साकारणाऱ्या वेगवेगळ्या भारतीय कलाकारांवर स्वतंत्र डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली. महात्मा गांधी साकारताना त्यांचे अनुभव यात कैद झाले. हा स्क्रीन प्रेझेंस बघणे खरोखरच अद्भुत आहे.’’

आज समारोप

या महोत्सवाचा रविवारी (ता. सात) सायंकाळी ६.३० वाजता दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे. समारोपाची फिल्म म्हणून सायंकाळी ‘अनॉटामी ऑफ फॉल’ दाखवली जाईल. तत्पूर्वी दुपारी १२ वाजता ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक ध्रुतीमान चॅटर्जी यांच्या ‘मृणाल सेन समजून घेताना’ या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. महान चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटांमधून चॅटर्जी यांनी प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. सर्व कार्यक्रम आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे होतील. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर कच्चे तेल महागले; आता पेट्रोल-डिझेल कितीला? महाराष्ट्रातील शहरनिहाय नवे दर जाहीर

Shaktipeeth Highway Drone Survey : ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी विठ्यात ‘ड्रोन सर्व्हे’, शेतकऱ्यांनी प्रशासनाला दाखवला हिसका; सांगलीत वातावरण तापलं

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ' प्रशासक नियुक्तीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर आज सुनावणी

Pakistan Occupied Kashmir: पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणाव शिगेला; धुमश्‍चक्रीत ११ जणांचा मृत्यू, ब्रिटिश खासदारांकडून चिंता व्यक्त

Maharashtra Education : चौथीच्या पुस्तकात मोठा बदल! छत्रपती शिवरायांच्या इतिहासासोबतच जोडले 'हे' खास पान; संत, थोर समाजपुरुषांच्या कार्यांची विद्यार्थ्यांना होणार ओळख

SCROLL FOR NEXT