छत्रपती संभाजीनगर

दोन महिन्यांत तडजोडीतून तेरा प्रकरणे निकाली महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान

CD
दोन महिन्यांत तडजोडीतून तेरा प्रकरणे निकाली ---- महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान ----- हिंगोली, ता. १५ : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय आणि हक्क पोचविणे हे क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांचे मूळ सूत्र होते. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने आणि तडजोडीने निपटारा करण्यासाठी जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दोन महिन्यांत १३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. हे अभियान एक सप्टेंबरपासून सुरू झाले असून, मार्च २०२७ पर्यंत राबविण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांत प्रलंबित महसुली दाव्यांचा अभियानात समावेश आहे. तडजोडीने आतापर्यंत १३ प्रकरणे निकाली निघाली. त्यात अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयातील चार, हिंगोली तहसीलमधील पाच आणि कळमनुरीतील चार प्रकरणांचा समावेश आहे. अर्धन्यायिक न्यायालयात प्रलंबित महसुली दाव्यातील दोन्ही पक्षकारांनी किंवा त्यांच्या वकिलांनी विहित नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज करावा. अर्जाची छाननी करून दोन्ही पक्षांची संमती निश्चित केली जाते. त्यानंतर कायदेशीर तडजोडनामा घेऊन लोकअदालतीच्या दिवशी अंतिम आदेश पारित करून प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढले जाते. --------- ((कोट)) महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान एक सप्टेंबरपासून राबविण्यात येत असून, आपापसातील तडजोडीने, सहमतीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण आहे. प्रलंबित सर्व महसुली दाव्यांचा अभियानात समावेश असून, या अभियानात नागरिकांनी सहभागी होऊन आपले काही वादाची प्रकरणे असतील तर ती मिटवून घ्यावीत. - राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Photography: डॉक्टरची निसर्गाशी अनोखी मैत्री! ऋषी गाडगे यांच्या छायाचित्रांतून उलगडले पक्ष्यांचे विश्व

दुर्गम भागातील मुलांसाठी शिक्षकाने उचललं मोठं पाऊल; 'सिनेमॅन'ची हटके कथा पोहोचली थेट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये!

तरुणीला भररस्त्यात अडवलं, शरीरावर सपासप वार केले अन्..., एकतर्फी प्रेमातून तरुणाचं क्रूर कृत्य; अंबरनाथमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : विहिरीच्या मोजणीसाठी उतरले अन् काळाने घात केला; मातीचा ढिगारा कोसळून चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू, आंबे गावावर शोककळा

Rajuri leopard cub : राजुरीत ऊसतोड सुरू असताना बिबट्याचा आठ दिवसांचा बछडा आढळला; शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीती

SCROLL FOR NEXT