Aurangabad Hoardings social media
छत्रपती संभाजीनगर

निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, औरंगाबादेत बॅनरची चर्चा

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : शहरात शनिवारी रात्रीपासून एका बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक (Aurangabad Municipal Corporation Election) लढवण्यासाठी बायको पाहिजे, अशा आशयाचे हे बॅनर असून शहरात तीन ठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच जातीची कुठलीही अट नाही, असंही या बॅनरवर लिहिलं आहे.

रमेश विनायकराव पाटील यांनी हे बॅनर लावले आहे. मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे. त्यासाठी कुठलीही जातीची अटक नाही. कुठल्याही जातीची महिला चालेल. वय वर्ष २५ ते ४० वयोगटातील अविवाहीत, विधवा किंवा घटस्फोटीत महिला चालेल. पण, त्यात एक अट ठेवण्यात आली आहे. या महिलांना दोनच अपत्य असावी. जास्त असेल तर त्या महिलांना स्वीकारण्यात येणार नाही, असं या बॅनरवर लिहिलं आहे.

मी सामाजिक कार्यकर्ता आहे. मी समाजासाठी खूप कामे केली आहेत. पण, लॉकडाऊनमध्ये मला तिसरं अपत्य झालं. त्यामुळे मी निवडणूक लढवण्यासाठी पात्र नाही. माझ्या घरातून एका व्यक्तीनं निवडणूक लढवावी आणि समाजाचे प्रश्न मांडावे असे मला वाटते. त्यामुळे बायको मिळाली तर मी तिला निवडणुकीसाठी उभे करणार. हे बॅनर लागल्यानंतर मला चार-पाच फोन आले. पण, मी त्यांना काहीही प्रतिक्रिया दिली नाही. दोन-तीन दिवसात आणखी फोन येतील. सर्वांचा विचार करून जी लोकांची सेवा करेल अशा महिलेची निवड केली जाईल. घरातून देखील याला विरोध नाही. आई-वडिलांशी देखील बोलणं झालं आहे. ज्या महिला इच्छूक असतील त्यांनी यावं. त्यांचं स्वागत आहे, असं पाटील यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT