Aurangabad
Aurangabad Aurangabad
छत्रपती संभाजीनगर

रागातून घर सोडलेल्या युवकाला सुखरूप पोचविले घरी

प्रकाश बनकर

औरंगाबाद: मध्यवर्ती बसस्थानकात औरंगाबाद-पुणे शिवशाही बसमध्ये बसलेला एक प्रवासी वारंवार बसमधून खाली आणि पुन्हा बस मध्ये बसत होता. हा प्रकार जवळपास दहा वेळा त्याने केला. यावर बसचे चालक सिद्धार्थ गायकवाड यांनी प्रवासाची विचारपूस केली असता, सदरील प्रवासी हा भोळसर असून तो रागा-रागाने घर सोडून बाहेर निघाला होता. या चालकाने त्यास विश्‍वासात घेत त्याच्या घरच्यांची संपर्क साधत त्याला कुटुंबीयापर्यंत सुखरूप पोचविले. ज्या चालकांचा तीन महिन्यापासून पगार झाला नाही, त्यांनी माणुसकी दाखवित या युवकाचे तिकिट काढत त्याला घरापर्यंत सोडून माणुसकीचा आदर्श घालून दिला.

मध्यवर्ती बसस्थानकात चालक म्हणून कार्यरत असलेले सिद्धार्थ गायकवाड यांनी सांगितले की, मध्यवर्ती बसस्थानकावरील प्लॉटफॉर्मवर एक वर मंगळवारी रात्री साडेसातच्या दरम्यान पुणे-औरंगाबाद शिवशाही बस लागली होती. या बसमध्ये अमोल हा वारंवार बसमध्ये येऊन बसायचा व खाली उतरायचा. असे दहा वेळेस त्याने केले. त्यामुळे मी त्याला जाऊन विचारले, कुठे जायचे आहे? पण तो काही सांगत नव्हता. थोड्या वेळाने त्यांने सांगितले की माझ्या घरच्यांना एक फोन लावायचा आहे. तुमचा फोन देता का?

त्यावर गायकवाड यांनी संबंधित व्यक्तीच्या घरी फोन लावून दिला असता त्याच्या आईने सांगितले की सदरील मुलगा असून तो कुटुंबीयांना सोडून गेल्या आठ दिवसापासून घराबाहेर निघून गेला आहे. या विषयी आम्ही शिरूर पोलिस ठाण्यात हरविल्याचीही तक्रार नोंदविली आहे. तुम्ही कृपया त्याला घरी आणा, असे विनंती त्या युवकाच्या आईने रडत रडत सिद्धार्थ यांच्याकडे केली. सदरील युवकाकडे तिकिटासाठी पैसे नव्हते, त्यामुळे आम्ही त्याला तिकिटाचे पैसे दिले व शिरूरकडे त्याच्या कुटुंबीयांकडे नेऊन सोडले, असेही सिद्धार्थ गायकवाड यांनी सांगितले. कुटुंबीयांना अमोलला पाहिल्यानंतर मोठा आनंद झाला. त्याच्या आईने आमचे आभार मानल्याचेही श्री. गायकवाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT