manoj jarange for maratha reservation at mumbai assembly election sakal
छत्रपती संभाजीनगर

Assembly Election : ...तर विधानसभेला गुलाल रुसेल; मनोज जरांगे

राज्य सरकारने आरक्षण घालविले तर सोडणार नाही

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ‘‘मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या वाशीमध्ये उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका, नाही तर विधानसभेत गुलाल तुमच्यावर रुसेल. इतकेच नव्हे तर मनोज जरांगे लढणार आहे, तुम्ही आरक्षण घालवले तर मी सोडणार नाही’’, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला.

ते म्हणाले, ‘‘तुम्ही नाही दिले तर आम्हाला राजकारणात उतरावे लागेल. विधानसभेच्या अनुषंगाने आचारसंहितेनंतर आरक्षणासंदर्भात निर्णय घेऊ म्हणाल, तर आम्ही ऐकणार नाही. लोहार-कुंभार समाजालाही सरकारी नोंदीआधारे आरक्षण द्यावे. मराठा समाजाची कुणबी पोटजात होऊ शकत नाही का?’’ असा सवालही त्यांनी सरकारला केला. ‘‘खऱ्या नोंदी असताना रद्द कराल, तर मराठे सरकारी कार्यालयांवर धडक मारतील. सरकारने एकही काम केलेले नाही’’, अशी खंतही जरांगे यांनी व्यक्त केली.

जरांगे यांची ७ जुलैला संवाद रॅली

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत ७ जुलैला परभणी भव्य संवाद रॅली काढली जाणार आहे. त्या रॅलीच्या आयोजनासंदर्भात सोमवारी (ता.२४) परभणीत बैठक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT