Manoj Jarange Patil sakal
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange Patil : पोलिसांनी थांबवली रॅलीतील बैलगाडी, संतप्त मराठा आंदोलकांची पोलिसांशी हुज्जत

Maratha Reservation Andolan: बैलगाडी अडविल्याने जाणाऱ्या येणाऱ्या समाज बांधवांनी तेथेच थांबून बैलगाडी सोडण्याची विनंती केली.

नवनाथ इधाटे पाटील

Chatrapati Sambhaji Nagar: टीव्ही सेंटर परिसरातून महा शांत कार्यालयासाठी सिडको बस स्टँडकडे येणाऱ्या बैलगाडीला पोलिसांनी अडविल्याने मराठा समाज बांधव अन् पोलीसात शनिवारी (ता.१३) सकाळी साडे दहा वाजता हुज्जत झाली.

त्यावेळी समाज बांधव आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांनी सदरील बैलगाडीची जबाबदारी एका मराठा समाज बांधवांवर देऊन बैलगाडी सिडको बस स्थानकाकडे रवाना केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या मराठा समाज बांधवांनी एक मराठा, लाख मराठा..! अशा घोषणा दिल्याने परिसर दणाणून गेला होता.

छत्रपती संभाजीनगर येथे आज होणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या महा शांतता रॅलीसाठी मागील गेल्या दोन दिवसापासून फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील ऋत्विक डिडोरे हा आपल्या बैलगाडीसह मराठा आरक्षणाच्या शांतता रॅलीसाठी जनजागृती करीत आहे. मात्र टीव्ही सेंटर परिसरात पोलिसांनी सदरील बैलगाडी अडविल्याने जाणाऱ्या येणाऱ्या समाज बांधवांनी तेथेच थांबून बैलगाडी सोडण्याची विनंती केली.

मात्र सदरील बैलगाडी पोलिसांनी सोडली नसल्याने शेवटी मराठा समाज बांधव किशोर पाटील बलांडे, बाळासाहेब थोरात, संदीपराव बोरसे, नंदू पाटील मोठे यांच्यासह आदींनी येऊन पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर हळूहळू येथे मोठा जमा जमू लागल्याने पोलिसांच्या लक्षात आले.

त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांशी चर्चा करून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाशी चर्चा केली. सदरील बैलगाडी कुठपर्यंत जाणार..? आणि रिटर्न येणार कधी..? याची जबाबदारी कोण घेणार..? असे प्रश्न विचारताच येथे आलेल्या सर्वांनीच ही माझी जबाबदारी असून तुम्ही बैलगाडी सिडको बस स्थानक पर्यंत जाऊ द्यावी, अशी मागणी केली.

त्यावेळी उपस्थित असलेल्या पोलीस निरीक्षक श्रीमती मिसाळ यांनी वरिष्ठांशी चर्चा करून नंदू मोठे यांच्यावर सदरील जबाबदारी दिली. त्यानंतर सदरील बैलगाडी स्थानकाकडे रवाना झाली. त्यावेळी उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी एक मराठा, लाख मराठा..! आरक्षण आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे.! अशा विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जमीन-जागा विक्रीतील थांबणार फसवणूक! प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याने काढावा ‘सर्च रिपोर्ट’; बॅंक कर्जाचा बोजा असलेली प्रॉपर्टी विकता येत नाही, वाचा...

दुर्दैवी योगायोग! 'चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू'; वीस दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू अन्..

Panchang 17 November 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या ‘E-kyc’ला निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ? उद्या संपणार 2 महिन्यांची मुदत; 1 कोटींवर महिलांनी अजूनही केली नाही ‘ई-केवायसी’

Liquid Gold For Winters: हिवाळ्यात राहाल निरोगी, सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

SCROLL FOR NEXT