thalassemia
thalassemia sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : लग्नापूर्वी जुळवा आरोग्यकुंडली! अपत्याला होणारा त्रास टाळा

मधुकर कांबळे

छत्रपती संभाजीनगर - तुळशी विवाहाच्या धामधुमीनंतर विवाहेच्छुक तरुण-तरुणांसाठी स्थळांची शोधाशोध सुरू होणार. कुणीतरी नात्यातील मुला-मुलींचा आग्रह धरणार. मग मुला-मुलींची जन्मकुंडली अर्थात पत्रिका आवर्जून बघितली जाणार. हजारांवर पाहुण्यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात लग्न लावले जाणार. त्यावर पाण्यासारखा पैसा खर्च होणार. लग्नसोहळ्याच्या जल्लोषाने वधू अन् वराकडील मंडळी खूश होणार.

मात्र, या जल्लोषात एका गंभीर धोक्याकडे दुर्लक्ष होईल. तो म्हणजे जनुकीय दोषांमुळे उद्भवणाऱ्या थॅलेसेमियाचा! म्हणूनच लग्न जुळविताना कुंडलीसोबतच दोघांचीही आरोग्यपत्रिका जुळणे, त्यासाठी दोघांचीही लग्नाआधी एकदा टेस्ट करणे काळाची गरज बनली आहे.

विवाहेच्छुक तरुण-तरुणी दोघेही दिसायला कितीही धडधाकट असले तरी, जर दोघेही ‘थॅलेसेमिया मायनर’ असतील तर होणाऱ्या संततीत ‘थॅलेसेमिया मेजर’ होण्याची २५ टक्के शक्यता, २५ टक्के सामान्य तर ५० टक्के ‘मायनर’ होण्याची शक्यता असते. यामुळे लग्न जुळवताना ‘एचपीएलसी’ ही थॅलेसेमियाची टेस्ट आयुष्यात एकदाच केली तर त्यांचा पुढचा खडतर प्रवास टाळता येईल आणि अपत्याला कुठलाही धोका राहणार नाही.

प्रातिनिधिक उदाहरणे

छत्रपती संभाजीनगरात सिडको एन -२ येथे ‘औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटी’च्या ‘डे केअर सेंटर’मध्ये पैठण तालुक्यातील बद्रीनाथ सोनवणे यांची भेट झाली. पती-पत्नी दोघेही थॅलेसेमिया ‘मायनर’ (वाहक) आहेत. त्यांना झालेला एक मुलगा ‘मेजर’ आणि दुसरा ‘नॉर्मल’ आहे.

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील वाजेद बासीत शेख यांची पत्नी त्यांच्या मावशीचीच मुलगी. दोघेही ‘मायनर’. त्यांचा मुलगा ६ महिन्यांचा असताना थॅलेसेमियाचे निदान झाले आणि आज तो १६ वर्षांचा आहे. त्यालाही दर १५ ते १८ दिवसांनी रक्त देण्यासाठी येथे यावे लागते.

चोवीस तास मोफत समुपदेशन सेवा

थॅलेसेमिया नियंत्रणात आला पाहिजे, लोकांमध्ये जागरूकता आली पाहिजे, या आजाराविषयी माहिती मिळावी यासाठी औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटीच्या श्री सत्य साई ब्लड सेंटरमध्ये चोवीस तास मोफत समुपदेशन सेवा डॉ. चव्हाण यांनी उपलब्ध करून दिली आहे.

यासाठी ९१६८१०४१०४ हा क्रमांक आहे. ‘डे केअर सेंटर’मध्ये ‘औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटीचे सचिव अनिल दिवेकर व त्यांचे सहकारी इथे येणाऱ्या रुग्णांना नाममात्र दरात रक्त देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

थॅलेसेमियाग्रस्त बालकाचा दोष नाही तर त्याला जन्म देणाऱ्या आई-वडिलांचा आहे. यासाठी लग्नापूर्वी थॅलेसेमियाची तपासणी केलीच पाहिजे. मधुमेहाच्या ‘टेस्ट’ वारंवार कराव्या लागतात. मात्र, ही ‘टेस्ट’ आयुष्यात एकदाच करायची असते, ती लग्नापूर्वी केलीच पाहिजे. तरच त्यानंतरचा खडतर प्रवास टाळता येईल.

- डॉ. महेंद्रसिंह चौहान

माझा मुलगा तीन महिन्यांचा असताना त्याला या आजाराचे निदान झाले. तेव्हापासून त्याला दर २० ते २२ दिवसांनी नियमितपणे रक्त द्यावे लागते. माझी बायको मामाचीच मुलगी आहे. आम्हालाही माहीत नव्हते, की आम्ही ‘मायनर’ आहोत.

- बद्रीनाथ सोनवणे, पालक.

ही आहेत कारणे

श्री सत्य साई ब्लड सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ. महेंद्रसिंग चौहान यांनी सांगितले, की थॅलेसेमिया आनुवंशिकतेने येणाऱ्या आजारांपैकी जगात क्रमांक एकवर आहे. जवळच्या नात्यात लग्न, आम्ही काय धडधाकट आहोत असा अतिआत्मविश्वास या गोष्टी टाळल्या तर होणारी संतती थॅलेसेमियामुक्त जन्माला येऊ शकेल. पती-पत्नी जर दोघेही ‘मायनर’ असतील तर तर ते पुढच्या पिढीकडे हा आजार आनुवंशिकतेने देतात.

त्यांना होणारे अपत्य ‘मेजर’ होण्याची २५ टक्के शक्यता, नॉर्मल होण्याची २५ तर मायनर होण्याची ५० टक्के शक्यता असते. आपल्या देशात सर्वाधिक प्रमाण पश्चिम बंगालमध्ये आहे. या राज्यात संकलित होणाऱ्या एकूण रक्तापैकी ४० टक्के रक्त थॅलेसेमियाच्या रुग्णांना द्यावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident News: पुण्यातील हिट अँण्ड रनप्रकरणी पोलिसाचं निलंबन? गृहमंत्र्याचे कठोर कारवाईचे आदेश; हे आहे कारण

Pune Accident Updates : 'त्या' अल्पवयीन आरोपीचा अपघातापूर्वीचा पबमधला व्हिडीओ आला समोर; पब चालकासह इतरांवर गुन्हे दाखल

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT