Chhatrapati Sambhajinagar Fire esakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Fire : छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा गुदमरून मृत्यू!

छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचा देखील समावेश आहे. ही घटना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Fire : छत्रपती संभाजीनगरातून मोठी बातमी समोर येत आहे. येथील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली असून यात दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

या मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचा देखील समावेश आहे. ही घटना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हे कपड्याचं दुकान छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

याबाबत माहिती देताना औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितलं की, "पहाटे चारला छत्रपती संभाजीनगरातील कॅन्टोन्मेंट परिसरात एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. प्राथमिक तपासानंतर या दुर्घटनेत सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मात्र, या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. सध्या पुढील तपास सुरू आहे..."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT