छत्रपती संभाजीनगर

माता-बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे

CD
माता-बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे ---- सीईओ पाटील यांचे निर्देश ः कुपोषित बालकांना तातडीने उपचार द्या ---- नांदेड, ता. १८ : दुर्गम भागातील माता-बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून नियमित क्षेत्रीय निरीक्षण करावे. तसेच कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या ‘गाभा’ समितीच्या बैठकीत किनवट व माहूर तालुक्यांतील आरोग्यसेवा, माता-बाल आरोग्य, कुपोषण प्रतिबंध आणि विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दोन्ही तालुक्यांतील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. आजारी विद्यार्थ्यांना तातडीने उपचार व आवश्यकतेनुसार संदर्भसेवा उपलब्ध करून द्यावी. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असलेल्या गर्भवती व मातांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांची नियमित तपासणी आणि औषधोपचार करावेत. तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत असल्याची खात्री करावी, अशा सूचना महेश पाटील यांनी दिल्या. नवसंजीवनी क्षेत्रातील गर्भवतींची अद्ययावत यादी प्रत्येक आरोग्य संस्थेत उपलब्ध ठेवून त्यांना ‘माहेरघर’ योजनेचा वेळेत लाभ द्यावा. शंभर टक्के संस्थात्मक प्रसूती आणि आवश्यक संदर्भसेवा सुनिश्चित करण्यावरही त्यांनी भर दिला. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नेवले, महिला व बालकल्याण अधिकारी डॉ. प्रशांत थोरात यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.---- कुपोषित बालकांवर तातडीने उपचार तीव्र व मध्यम तीव्र कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी आरोग्य आणि महिला व बालविकास विभागाने समन्वयाने मोहीम राबवावी. आढळलेल्या बालकांची तपासणी करून त्यांना तातडीने उपचार द्यावेत. अधिकाऱ्यांनी दुर्गम भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करावी आणि प्रलंबित बाबींचा तातडीने निपटारा करावा, असेही महेश पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

Spinal Pain: पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठी कोणत्या कुशीवर झोपणे योग्य? पाठ टेकून झोपण्याचेही आहेत फायदे!

2026 च्या शेवटच्या 3 महिन्यांची बाबा वेंगांची भविष्य वाणी व्हायरल; ‘या’ राशींबाबत चर्चांना उधाण!

Latest Marathi News Live Update : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.७४ टक्के मतदान; ५,४०४ मतदारांचा सहभाग

SCROLL FOR NEXT