MBBS Microbiology paper leak university had cancel the exam sakal
छत्रपती संभाजीनगर

एमबीबीएसचा पेपर फुटला

विद्यापीठाला दिलेल्या पेपरचीच चार महिन्यांपूर्वी सराव परीक्षा

विकास गाढवे

लातूर : नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) हिवाळी परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत एमबीबीएसच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजी विषयाचा शुक्रवारी (ता. ११) दुपारच्या सत्रात घेण्यात आला. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या हातात हा पेपर पडल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला; कारण हा पेपर जसाच्या तसा नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयात घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत आला होता. यामुळे चार महिन्यांपूर्वीच हा पेपर फुटल्याचा साक्षात्कार झाला आणि विद्यापीठाला या विषयाची परीक्षा रद्द करावी लागली.

या विषयाचा पेपर तयार करण्याची (पेपर सेटिंग) जबाबदारी दिलेल्या येथील महाविद्यालयातील प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत असून, विद्यापीठाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्यापीठाच्या वतीने एमबीबीएस (२०१९) द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजी - १ या विषयाची शंभर गुणांची लेखी परीक्षा शुक्रवारी दुपारच्या सत्रात अडीच ते साडेपाचदरम्यान राज्यातील ४१ केंद्रावर घेण्यात आली. सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हा पेपर सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांत कुजबुज सुरू झाली. महाविद्यालयात नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत देण्यात आलेला पेपर व शुक्रवारच्या विद्यापीठाच्या परीक्षेतील पेपरमध्ये काहीच फरक नव्हता. सर्व प्रश्न सारखे होते. परीक्षा झाल्यानंतर वाऱ्यासारखी माहिती राज्यात पोचली.

‘लातूर पॅटर्न’ची चर्चा सुरू

या विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी विद्यापीठाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकावर दिली होती. हिवाळी परीक्षा जानेवारीमध्ये घेण्याचे नियोजन होते. मात्र, परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. जानेवारीच्या परीक्षेसाठी नोव्हेंबरमध्येच संबंधित प्राध्यापकांनी प्रश्नपत्रिका तयार करून विद्यापीठाला दिली होती. नेमक्या याच काळात महाविद्यालय पातळीवर झालेल्या सराव (प्रिलिम) परीक्षेत प्राध्यापकांनी विद्यापीठाला दिलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली. शुक्रवारी विद्यापीठाची परीक्षा देताना हातात पेपर पडल्यानंतर विद्यार्थ्यांना हा पेपर सराव परीक्षेत आल्याचा उलगडा झाला आणि या परीक्षेचा पेपर चार महिन्यांपूर्वीच फुटल्याने परीक्षेतील ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा घडून आली.

‘जुन्या’ची फेरपरीक्षा नाही

या प्रकाराबाबत शनिवारी सावध भूमिका घेत विद्यापीठाने महाविद्यालयीन स्तरावर झालेल्या घटनेमुळे व काही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तसेच विद्यापीठ कार्यप्रणालीतील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राहावी म्हणून शुक्रवारची मायक्रोबायलॉजी - १ विषयाची परीक्षा रद्द करून नव्याने घेण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या परीक्षेला शुक्रवारी गैरहजर असलेले विद्यार्थी २६ मार्चच्या फेरपरीक्षेला बसू शकतील; तसेच द्वितीय वर्ष एमबीबीएसच्या जुना अभ्यासक्रमातील याच म्हणजे मायक्रोबायलॉजी - १ या विषयाची फेरपरीक्षा घेण्यात येणार नाही. या विषयाचा शुक्रवारी विद्यार्थ्यांनी दिलेला पेपर ग्राह्य धरण्यात येणार असून, द्वितीय वर्षाच्या सर्व विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा आता २१ ऐवजी २८ मार्चपासून सुरू होतील, असेही परीक्षा नियंत्रक पाठक यांनी सांगितले.

२६ मार्चला होणार फेरपरीक्षा

विद्यापीठालाही याची माहिती मिळाल्यानंतर परीक्षा मंडळाने याची गंभीर दखल घेत शनिवारी (ता. बारा) दुपारी बैठक घेतली. बैठकीत या पेपरच्या परीक्षेची विद्यार्थ्यांची कामगिरी रद्दबातल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी सांगितले. दरम्यान, या विषयाची फेरपरीक्षा २६ मार्चला सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून, ही परीक्षा यापूर्वीच्या केंद्रावरच व यापूर्वी दिलेल्या प्रवेशपत्रावरच घेण्यात येणार असल्याचे श्री. पाठक यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT