Aurangabad City news
Aurangabad City news 
छत्रपती संभाजीनगर

बेरोजगारांना संधी...लाॅकडाऊननंतर इथे होणार मेगाभरती 

माधव इतबारे

औरंगाबाद : अनेक वर्षांपासून रखडलेला महापालिकेचा आकृतिबंध मंजूर होण्याची शक्यता असून, आगामी सहा महिन्यांत रिक्तपदांसह नवी नोकरभरती केली जाईल, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सध्या आऊटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्यांवरच महापालिकेचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर आकृतिबंध मंजूर करण्याची विनंती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे पांडेय यांनी सांगितले. 

महापालिकेतील कर्मचारी भरती आकृतिबंधाचा प्रस्ताव तत्कालीन महापौर भगवान घडामोडे यांनी १८ जुलै २०१७ च्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. यावेळी सर्वसाधारण सभेने ३६ दुरुस्त्या करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार दुरुस्ती करून हा प्रस्ताव शासनाला पाठविणे गरजेचे होते. मात्र, दोन वर्षांत महापालिकेच्या आस्थापना विभागाने या प्रस्तावावर कुठलाही निर्णय घेतला नाही. विशेष म्हणजे, शासनाने वारंवार महापालिकेला स्मरणपत्र दिले. दरम्यान, तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक व उपायुक्त मंजूषा मुथा यांनी नवीन प्रस्ताव तयार करून तो १८ जुलै २०१९ च्या सभेत आणला.

त्यावर माजी नगरसेवक समीर राजूरकर यांच्यासह अधिकारी संघटनेने आक्षेप घेत जुना प्रस्तावच शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. नव्या प्रस्तावात अनेक विभागातील पदे उडविण्यात आली होती. तसेच विभागप्रमुखांचे अधिकार कमी होतील, अशी रचना केली होती. त्यामुळे नगरसेवकांनी देखील नव्या प्रस्तावाला विरोध केला. दोन्ही प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर तत्कालीन महापौर नंदकुमार घोडेले यांनी जुनाच प्रस्ताव दुरुस्तीसह शासनाला पाठविण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

त्यानंतर आकृतिबंध व सेवाभरती नियमांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. यासंदर्भात पांडेय म्हणाले की, महापालिकेचे कामकाज सुधारण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी कर्मचारी-अधिकाऱ्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. आजघडीला शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामकाज आऊटसोर्सच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरू आहे. आगामी सहा महिन्यांत आकृतिबंधानुसार नोकरभरती करण्याचे आपले उद्दिष्ट आहे.

कामगारांना पूर्ण पगार मिळालाच नाही, कोर्टाचे दरवाजे ठोठावले अन...

काय आहे आकृतिबंधात? 
आकृतिबंधात आगामी २५ वर्षांची मनुष्यबळाची आवश्‍यकता गृहीत धरलेली आहे. जुन्या आकृतिबंधात आधीच्या मंजूर ४,३४४ पदांव्यतिरिक्त २,११७ नवीन पदे निर्माण करण्यात आली होती. दरम्यान, नवीन पदांची संख्या २,११७ ऐवजी २,९२४ पर्यंत वाढविण्याचे सर्वसाधारण सभेने सूचित केले. त्यामुळे रिक्त पदांसह नवीन पदांची महापालिकेत मेगाभरती होऊ शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT