Abdul Sattar sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : ‘त्या’ चिमुरड्याच्या भेटीला ; कृषिमंत्री

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी रात्री ऋषिकेश चव्हाणची भेट घेतली

सकाळ वृत्तसेवा

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी रात्री ऋषिकेश चव्हाणची भेट घेतली

सिल्लोड : पैसे नसल्यामुळे दिवाळी सणाची खरेदी केली नसल्याचा गंगापूर तालुक्यातील चिमुरड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी बुट्टे वडगाव (ता.गंगापूर) येथील त्या चिमुड्याची भेट घेऊन चव्हाण कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच शासन सर्वतोपरी मदत करण्यात कटिबद्ध असल्याचे सांगितले.

अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान झाल्याने चव्हाण कुटुंबातील ऋषिकेश चव्हाण या चिमुकल्याने एका वृत्त वाहिनीच्या माध्यमातून चव्हाण कुटुंबीयांची परिस्थिती समोर आणली होती. याचा व्हिडिओ देखिल व्हायरल झाला. त्यानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी रात्री ऋषिकेश चव्हाणची भेट घेतली. आणि दिवाळीसाठी चव्हाण कुटुंबीयांना कपडे, मिठाई, फटाके तसेच ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील असे श्री.सत्तार म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार नितीन पाटील, वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, केतन काजे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे यांची उपस्थिती होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT