mental health  Sakal
छत्रपती संभाजीनगर

World Mental Health Day 2024 : मानसिक आजाराला मोबाइल कारणीभूत....जनजागृतीचा अभाव : सत्तर टक्के लोकांमध्ये उपचाराला उशीर

Mental Health : मानसिक आजारांमध्ये वाढ होत असून, सत्तर टक्के रुग्णांना उशिरा उपचार मिळतात. यामध्ये रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरणे हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मानसिक आजार असलेल्या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. परंतु, त्या तुलनेत आजही आजार वाढल्यावर रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तब्बल सत्तर टक्के रुग्ण आजार वाढल्यावर रुग्णालयात पोचतात.

त्यामुळे आजाराबाबत जनजागृतीचा अभाव असल्याचे दिसते. दुसरे म्हणजे येणाऱ्या रुग्णांपैकी पन्नास टक्के रुग्णांचे नातेवाईक रुग्ण रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरत असल्याची तक्रार करतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

वाढणारे व्यसनांचे प्रमाण, ताणतणाव, आपल्या अपेक्षेपेक्षा मोठे काम करणे, त्यात अपयश आल्यास मानसिक आजार जडत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः व्यसन हे प्रमुख कारण आहे. यात विविध प्रकारचा नशा लहान वयापासून केला जात आहे. अशी व्यसने असलेली दहा वर्षांची मुलेदेखील उपचारासाठी येतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांपैकी प्रत्येक दुसऱ्या रुग्णात नातेवाईक इतर गोष्टींबरोबर रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरत असल्याचे सांगतात. रात्री नऊनंतर मोबाइल बंद करा, हे आम्हालाच रुग्णांना सांगावे लागते. हे चित्र कुठेतरी बदलावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ही देखील आहेत लक्षणे?

  • विचित्र वागणे.

  • विषय सोडून बोलणे.

  • एकटे राहणे.

  • घराबाहेर न पडणे.

दूर राहण्यासाठी काय करावे ?

  • ताणतणावापासून दूर राहावे.

  • त्यासाठी मेडिटेशन, धारणा, ध्यान करावे.

  • सोशल मीडियाचा वापर कमी करावा.

  • मोबाइलचा अतिवापर टाळावा.

देशाचा विचार केल्यास प्रत्येक तिसऱ्या माणसाच्या आयुष्यात एकदा तरी अशी परिस्थिती आलेली असते. यात सायकोसिसचे प्रमाणही अधिक असते. व्यसन, ताणतणाव, मोबाइलचा वाढता वापर ही कारणे यात दिसतात. जनजागृती नसल्याने लक्षणे वाढल्यावर लोक उपचारासाठी येतात. परंतु, गैरसमज दूर करून उपचार घ्यावेत.

— डॉ. मेराज कादरी, मानसोपचारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT