छत्रपती संभाजीनगर

कारची दुचाकीला जोराची धडक; एकजण गंभीर जखमी

CD
कारच्या धडकेत दुचाकीचालक गंभीर जखमी आष्टी, ता. १३ (बातमीदार) : नातेवाइकांकडील कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून घरी परतत असताना लिंबोडी फाट्याजवळ भरधाव कारने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (ता. दहा) रात्री अकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पाटण येथील मच्छिंद्र भाकरी यादव (वय ४९) हे मंगळवारी (ता. दहा) रात्री कुंभारवाडी येथे नातेवाईक सागर कोंडिबा ढोबळे यांच्या मुलाच्या नामकरण कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दुचाकी (क्र. एमएच १६ डीबी ६८३१) वरून गावाकडे परतत होते. रात्री अकराच्या सुमारास लिंबोडी फाट्याजवळ आले असता, धामणगावच्या दिशेने येणाऱ्या कारच्या (क्र. एमएच २३ बीएन ८१७१) चालकाने वाहन निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवत यादव यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या धडकेत यादव हे दुचाकीवरून खाली पडले. त्यांच्या उजव्या पायाचे हाड व डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमी मच्छिंद्र यादव यांचा मुलगा आकाश यादव (वय २६, रा. सांगवी पाटण) याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील कार व दुचाकी कडा पोलिस चौकी येथे जमा करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार भाऊसाहेब आसाराम आहेर करीत आहेत. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Merger Politics : "भाजपला दूर ठेवून आम्ही पुढे कसे जाणार?"; दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणातील सर्वात मोठा पेच उघड!

मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प होताच २०२४ च्या 'त्या' घटनेची आठवण; एका अपडेटनं जगभर उडवला होता गोंधळ

Latest Marathi News Live Update: मेहत्रे वस्ती येथील प्लास्टिक कंपनीला भीषण आग

Winter Skincare Tips: हिवाळ्यात चेहरा काळपट पडू नये म्हणून काय करावं? त्वचेची चमक टिकवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स

IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'

SCROLL FOR NEXT