mpsc exam 
छत्रपती संभाजीनगर

MPSC Exam: राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी सुरु; १४ मार्चला होणार परीक्षा

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून राज्यसेवा परिक्षेवर कोरोनामुळे अनिश्चिततेचे सावट होते. पण आता जिल्हा प्रशासनाने परिक्षेची तयारी जोरात करत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औरंगाबादेतील ५९ जिल्हा केंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्च २०२१ रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे.

पहिले सत्र सकाळी १० ते १२ आणि दुसरे सत्र दुपारी ३ ते ५ या कालावधीत घेणार असून ही परीक्षा शहरातील ५९ उपकेंद्रावर होणार आहे. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांनी आधार कार्ड, आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायन्स यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्यांची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

परीक्षेकरिता नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना कोविड-१९ विषाणूच्या अनुषंगाने चाचणी करणे आवश्‍यक असणार आहे. परीक्षेसाठी १९ हजार ६४६ उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठविण्यात आली असून, या परीक्षेच्या कामासाठी २ हजार १६७ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: लग्नासाठी सोनं घेणार? आधी ही बातमी वाचा! 20 हजारांनी महागलं सोनं; सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर? पाहा ताजा भाव

VIRAL VIDEO: इंग्लंडच्या स्टार गोलंदाजाला नाइटक्लबबाहेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?

Akola Online Vehicle Fraud: वाहन विक्रीच्या आमिषाने ९.९० लाखांची फसवणूक: नागपुरातून आरोपी जेरबंद; फसवणुकीतील एक लाख गोठविले

Marathi News Live Updates : पंढरपूरमध्ये अचानक भाविकांची गर्दी वाढली

Hockey World Cup : भारत-अर्जेंटिनामध्ये आज लढत रंगणार; हरमनच्या सेनेचा दुसऱ्या फेरीतील अखेरचा सामना

SCROLL FOR NEXT