Hockey World Cup
sakal
ॲमस्टेलविन - भारतीय पुरुष हॉकी संघ उद्या (ता. २४) अर्जेंटिनाशी लढणार आहे. हॉकी विश्वकरंडकातील दुसऱ्या फेरीतील ई गटातील भारताची ही अखेरची लढत असणार आहे. हरमनप्रीत सिंगच्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर आहे. अर्जेंटिनावरील मोठा विजय आणि चीन- नेदरलँड्स यांच्यामधील सामन्याचा निकाल या सर्व बाबींवर भारताचे भवितव्य अवलंबून आहे.