Mud stone pelting on name of Aurangabad ink on imtiyaz Jaleel name
Mud stone pelting on name of Aurangabad ink on imtiyaz Jaleel name sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : औरंगाबाद नावावर चिखलफेक, दगडफेक

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात निघालेल्या हिंदू जन गर्जना मोर्चानंतर मोर्चेकऱ्यांनी राडा केला. मोर्चा संपल्यानंतर घरी जाताना औरंगपुरा ते निराला बाजार मार्गावर जिथे औरंगाबाद दिसेल तिथे दगडफेक केली.

महापालिका शौचालयावरील औरंगाबाद नावावर चिखल फासला तर, क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील कोनशीलेवर खासदार इम्तियाज जलील यांच्या नावावर पेनातील शाई फासण्यात आली. यानंतर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त लावला आहे.

छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनात आणि गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर यावरील मागण्यांसाठी रविवारी (ता. १९) सकाळी क्रांती चौक ते अदालत रोड मार्गे औरंगपुरा असा विराट ‘हिंदू जन गर्जना मोर्चा’ काढण्यात आला.

मोर्चाच्या शेवटी हैद्राबाद येथील भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी आक्रमक भाषण केले. याठिकाणी मोर्चाला हजारो तरुण आले होते. भाषण सुरु असतानाच शिवसेना भवनावरून काही तरुणांनी दगडफेक केली. भाषण संपल्यानंतर हे तरुण घरी जाताना जिथे औरंगाबाद नावाचे फलक दिसतील, त्याठिकाणी नासधूस केली.

औरंगपुरा येथील सभेच्या ठिकाणाहून ५० मीटर अंतरावरील महापालिकेचे सुलभ शौचालय आहे. त्याठिकाणी असलेल्या औरंगाबाद नावावर मोर्चेकऱ्यांनी चिखल फासला. त्यानंतर सरस्वती भूवन महाविद्यालयाच्या बस थांब्यावरील औरंगाबाद बोर्ड फोडून टाकले.

त्यापुढील बस थांब्यावरील बसच्या वेळापत्रक फलक काढून चिखलात टाकण्यात आले. तसेच ॲक्सिस बँकेच्या शाखेवर औरंगाबाद नाव दिसल्याने त्याठिकाणी मोर्चेकऱ्यांनी दगडफेक केली. तसेच औरंगाबाद नावाचे दुकानांबाहेरील पोस्टरही फाडण्यात आले. दगडफेकीतील दोघांना पोलिसांनी धरुन ठेवले होते.

जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण यांनी सिडको चौक ते हर्सुल रस्त्यावरील एसबीआय चौकातील पिरॅमीड जवळील ‘आय लव औरंगाबाद’चा डिजिटल फलक फोडला. मोर्चा निघाल्यानंतर औरंगपुरा, निराला बाजार, सिल्लेखाना चौक, पैठण गेट, क्रांती चौक, एसबीआय चौक याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

जलीलांच्या नावाला फासली शाई

क्रांती चौकात वर्षभरापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. चौथऱ्या शेजारी असलेल्या कोनशीलेवर खासदार इम्तियाज जलील यांचे नाव होते. मोर्चाच्या दरम्यान, काही उपस्थितांनी जलील यांच्या नावावर पेनातील शाई फासत नाव पुसण्याचा प्रयत्न केला. मोर्चा संपल्यानंतर क्रांती चौकात पोलिसांची कुमक वाढण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT