औरंगाबाद औरंगाबाद
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत भाजप आक्रमक; मुख्यमंत्र्यांचे पोस्टर जाळले

आज सकाळपासून राज्यभरात शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात आंदोलने करताना दिसत आहेत.

प्रमोद सरवळे

आज सकाळपासून राज्यभरात शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात आंदोलने करताना दिसत आहेत.

औरंगाबाद: केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (narayan rane) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधांनामुळे आज महाराष्ट्रभर शिवसेना आक्रमक झालेली दिसली होती. ठिकठिकाणी नारायण राणेंचे पुतळे जाळले होते, काही ठिकाणी फोटोंना काळं फासलं तर काही ठिकाणी गाढवावरून मिरवणूकही काढली होती. वाढता तणाव पाहता रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली आहे. तर इकडे औरंगबादेत भाजपही आक्रमक झालेली दिसत आहे. राणेंना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक झालेली दिसत आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकात भाजपने आंदोलन केले आहे. याच ठिकाणी सकाळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही राणेंविरोधात आंदोलन केले होते.

या आंदोलनात मुख्यमंत्र्यांचे पोस्टर जाळले आहेत. या पोस्टरवर 'घर कोंबडा' असं लिहलेलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात आणि राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या जात आहेत. या आंदोलनाठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. आज सकाळपासून राज्यभरात शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात आंदोलने करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT