National Rural Employment Guarantee sakal
छत्रपती संभाजीनगर

राज्यात हमी योजनेच्या कामात औरंगाबाद पहिल्या स्थानावर

जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तब्बल २५२ टक्के काम

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्हानिहाय मनुष्यदिवस निर्मितीचा तुलनात्मक निर्देशांक नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्याने मागील वर्षाच्या तुलनेत २५२ टक्के काम करत राज्यामध्ये पहिले स्थान पटकाविले आहे. चालू वर्षात पाचपट अधिक कामे होईल याप्रमाणे नियोजन करावे अशा सूचना रोजगार हमी योजनेचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी दिल्या आहेत.

मनरेगाअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरी, गोठे, वृक्षलागवड, फळबाग लागवड्यासह इतर कामे केली जातात. गावपातळीवर मजुरांना १०० दिवस काम उपलब्ध व्हावे या दृष्टीने नियोजन केले जाते. दरम्यान १७ फेब्रुवारीपर्यंतचे जिल्हानिहाय मनुष्य दिवस निर्मितीचा तुलनात्मक अभ्यास केला असता मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी औरंगाबाद जिल्हा १०० टक्केच्या वर पोचला आहे. जिल्ह्याने २५२ टक्के एवढे काम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे तसेच सर्व तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

२४ लाख मनुष्यदिवस निर्मिती

जिल्ह्याला मनरेगाअंतर्गत २०२१-२२ मध्ये १३ लाख ५४ हजार मनुष्यदिवस कामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सद्यःस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये २ हजार ८४१ वैयक्तिक सिंचन विहिरी, दोन हजार २४३ गोठे व चार हजार ८४८ वृक्षलागवडींची कामे जिल्ह्यात सुरू आहेत. या सर्व कामांमधून आजपर्यंत २४ लाख मनुष्यदिवस निर्मिती झालेली आहे, जी उद्दिष्टांच्या २५२ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT