covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

मैदानावर 'तो' जिंकला पण बेड न मिळाल्याने आयुष्याची लढाई हारला

राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूला बेड न मिळाल्याने आधी घरीच घ्यावे लागले उपचार

यादव कुमार शिंदे

औरंगाबाद: नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सोयगाव येथील राष्ट्रीय शूटिंग व्हॉलिबॉल खेळाडू सुशील सुनील पाटील याचा अवघ्या २४ व्या वर्षी कोरोना संसर्गाने (covid 19 infection) बळी घेतला. या घटनेमुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

सुशीलला ता.२२ एप्रिलला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचा एचआरसीटी स्कोअर एक होता. नाशिकला उपचार घेण्याचा त्याने विचार केला; परंतु बेड उपलब्ध नसल्याने शेवटी त्याला घरीच उपचार घ्यावे लागले. सुशीलला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ओझरमधील खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी उपचारांची यंत्रणा अपूर्ण होती. ऑक्सिजनही नव्हता. परिणामी ता.२८ एप्रिलला सुशीलला नाशिकच्या एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. नीरज मोरे, डॉ. रुचिरा, डॉ. पटेल त्याच्यावर उपचार करत होते. सुशीलच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. परंतु 3 मे ला रात्री हृदयविकाराचा धक्का आल्याने सुशीलचे निधन झाले. घरचा सधन, कोटीचा विमा आणि कुटुंबीयांची खर्च करण्याची तयारी असूनही केवळ वेळेवर बेड न मिळाल्याने ओझर ते नाशिक धावपळ करावी लागून एका राष्ट्रीय खेळाडूच्या आयुष्याची दोर २४ व्या वर्षी तुटली.

बीएससी ॲग्रीचा पदवीधर असलेल्या सुशीलला क्रीडा क्षेत्रात चुणूक दाखवून सोयगावचे नाव उंचावर लौकिक करण्याची इच्छा होती. परंतु ही इच्छा अर्ध्या वाटेवरच अपूर्ण राहिली. या खेळाडूला वेळेवर बेड मिळाला असता तर चित्र वेगळे राहिले असते, असे अजूनही सुशीलच्या कुटुंबीयांना वाटत आहे. नाशिक शहरासह राज्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत.

कोरोना संसार्गातही राज्य शासनाला गांभीर्य नसल्याची भावना मृत सुशीलचे काका सोयगावचे माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी व्यक्त केली. रेमडेसिव्हिर व टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा राज्यभर काळाबाजार सुरूच आहे. रेमडेसिव्हिर २५ हजार तर आणि टोसिलीझुमॅबसाठी दोन ते अडीच लाख रुपये मोजावे लागत आहेत. सुशीलच्या उपचारासाठी धावपळ करताना हा अनुभव आम्ही घेतला, असे योगेश पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT