Navratri Festival 2022 
छत्रपती संभाजीनगर

Navratri Festival : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांच्या मूर्तींचे : शहरवासीयांना घडणार दर्शन

निर्बंध नसल्याने नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू

सचिन माने

औरंगाबाद : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांच्या मूर्ती या वर्षी शहरात विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच या मूर्ती यंदा मंडळात बसविल्या जाणार असल्याने नवरात्र उत्सवात भाविकांना शहरातच देवीच्या साडेतीन शक्तिपीठांच्या मूर्तींचे दर्शन घेता येणार आहे.

नवरात्रोत्सवात मंडळाच्या वतीने देवींच्या मूर्ती बसविण्यात येतात. कोरोनाचे संकट दूर झाल्याने यंदा देवीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात मागवण्यात आल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर व नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी या शक्तिपीठांच्या मूर्तींचा समावेश आहे.

पूर्ण शक्तिपीठांपैकी कोल्हापूरची महालक्ष्मीची देवी, तुळजापूरमधील तुळजाभवानी, माहूर येथील रेणुकामाता या तीन देवींना पूर्ण शक्तिपीठाचा तर नाशिक येथील वणीतील सप्तशृंगी देवीला अर्धशक्तिपीठाचा मान आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा सावट होते. त्यामुळे नवरात्रोत्सव साजरा करण्यात मर्यादा आल्या होत्या. शहरातील देवीच्या मंदिरातही दुरूनच दर्शन घ्यावे लागत होते. यंदा निर्बंध नसल्याने पुन्हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी केली जात आहे. यंदा वीस ते पंचवीस टक्के मोठ्या मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली असून त्यासाठी मजुरी, वाहतूक खर्च वाढल्याने मूर्ती महाग झाल्याचे मूर्तिकार डी. एस. जवळेकर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT