MUK26B00782 मुखेड : विद्यानिकेतन कमळेवाडी येथे सायन्स क्लबतर्फे विमोचन करण्यात आलेले ‘जिज्ञासा’ भित्तीपत्रक.
-----
‘जिज्ञासा’ भित्तीपत्रकातून ओझोन संरक्षणाचा संदेश
-----
मुखेड, ता. ४ (बातमीदार) : राज्यातील भटक्या-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कमळेवाडी येथील विद्यानिकेतन पब्लिक स्कूलमध्ये शालेय विज्ञान मंडळाच्या वतीने जागतिक ओझोन दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. २) ‘जिज्ञासा’ या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होण्यासोबतच पर्यावरण रक्षणाची जाणीव वाढावी, या उद्देशाने शाळेत सायन्स क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबच्या माध्यमातून तयार केलेले हे पहिले भित्तीपत्रक आहे.
‘जिज्ञासा’ भित्तीपत्रकात पृथ्वीचे कवचकुंडल असलेल्या ओझोन थराचे महत्त्व, ओझोन थराला हानी पोहोचविणारे क्लोरो-फ्लोरो-कार्बन वायू, अतिनील किरणांचे दुष्परिणाम, मॉन्ट्रियल करार (१६ सप्टेंबर १९८७) तसेच ओझोन संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत विद्यार्थ्यांनी आकर्षक व माहितीपूर्ण स्वरूपात मांडणी केली आहे. ‘जिज्ञासा’ या भित्तीपत्रकाचे विमोचन प्राचार्य सोपानराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
-----
सायन्स क्लबची कार्यकारिणी
सायन्स क्लबच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी आयुष पोफळे, उपाध्यक्षपदी दुर्गा खांडरे, सचिवपदी अंजली गर्जे, तर सहसचिवपदी शुभम गजभारे यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून प्रसाद लाभशेटवार, जयदीप डोईफोडे, वैशाली खांडेकर, प्रगती पवार, प्रशांत वाणी, विनायक कोळी, आरूषी जाधव, आदर्श राठोड, अंकिता श्रीरामे यांचा समावेश आहे. या पहिल्या भित्तीपत्रकाच्या निर्मितीसाठी सायन्स क्लबचे अध्यक्ष आयुष पोफळे, शुभम गजभारे, प्रशांत वाणी, विनायक कोळी आदींनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी प्राचार्य सोपानराव शिंदे, विज्ञान विभागप्रमुख यशवंत बोडके, विज्ञान शिक्षक तुकाराम वडजे, विजय पेंडकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी विज्ञान व पर्यावरण विषयक माहिती सर्जनशील पद्धतीने मांडल्याबद्दल त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.