A dairy farmer tends to cattle as rising feed costs put pressure on milk production.

 

esakal

छत्रपती संभाजीनगर

Dairy Farmers: पशुखाद्याचे भाव वाढल्याने ; दुग्ध व्यवसाय अडचणीत

Paithan Dairy Farmers Face Rising Cattle Feed Costs : पशुखाद्याचे दर प्रतिकिलो ४० रुपयांवर पोहोचल्याने पैठण तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; उत्पादन खर्च वाढला, मात्र दुधाच्या खरेदी दरात अपेक्षित वाढ नसल्याने व्यवसाय अडचणीत.

सकाळ वृत्तसेवा

पैठण, : दूध उत्पादनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे खरेदी दरात मात्र अपेक्षित वाढ होत नसल्याने पैठण तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. पशुखाद्याच्या भडकलेल्या दरांमुळे शेतीपूरक दुग्ध व्यवसायाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

यंदा दुष्काळामुळे खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय आता मक्याचे दर प्रतिक्विंटल साडेतीन हजारांवर पोचले आहेत. त्यासोबत सोयाबीन देखील महागल्याने गेल्या महिनाभरात पशुखाद्यात प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या पशुखाद्य ४० रुपये किलोवर पोचले असून हिरवा चारा, औषधोपचार व मजुरीचा खर्चही प्रचंड वाढला आहे. या वाढत्या खर्चाच्या तुलनेत दुधाला मिळणारा भाव अत्यंत नगण्य असल्याने हा व्यवसाय परवडणारा राहिला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

कंपन्यांकडून पशुखाद्याचे दर सातत्याने वाढवले जात आहेत; मात्र त्या प्रमाणात दुधाला खरेदी दर मिळत नाही. शासनाने पशुखाद्याच्या वाढीव दरांचा विचार करून दूध खरेदी दरातही तातडीने वाढ करावी.

- नितीन म्हस्के, दूध उत्पादक शेतकरी, आखातवाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलिसांचा अपमान, मृतदेह डंपरमधून नेल्याने संताप; भाजप आमदारांचा जम्मू-काश्मीर पोलिसांवर हल्लाबोल

वडिलांच्याच बँकेच्या ATM मधून संकर्षणने चोरले पैसे; आठवण सांगताना म्हणाला...'आजोबामुळे वाचलो'

Marathi Language : आमची मराठी नेमकी कोणती? मिलेनियल आणि जेन झी पिढीच्या भाषेचा बदलता चेहरा

Latest Marathi News Live Update : उजनी धरणावरील कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती केंद्राला विरोध तीव्र, प्रकल्प रद्द करण्यासाठी २७ नोव्हेंबरला मशाल मोर्चा

Ramlila Maidan : रामलीला मैदानावर आता ५० हजारांपेक्षा अधिक आंदोलकांना प्रवेश नाही? दिल्ली पोलिसांची नवी नियमावली प्रस्तावित

SCROLL FOR NEXT