डोस Sakal
छत्रपती संभाजीनगर

परभणी : दुसरा डोस अजूनही निम्म्यावर

प्रशासकीय पातळीवर गांभीर्य हवे नागरिकांचा सहभाग वाढविणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा

परभणी: कोरोना लसीकरणाच आघाडीवर असलेले राज्यातील १४ जिल्ह्यामधील निर्बंध राज्यशासनाने शिथिल केले आहेत. परंतू, परभणीत सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली असतांनाही काही अंशी निर्बंध लागूच आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे जिल्ह्यात लसीकरणाचा कमी असलेला वेग हेच आहे. जिल्ह्यात आता पर्यंत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५८.०४ टक्के इतकी आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आता ओसरली आहे. या लाटेत पुन्हा मोठ्या प्रमाणात लोक बाधित झाले होते. परंतू अल्पावधीतच ही लाट ओसरली आहे. परंतू, अद्यापही या जिल्ह्यातील कोरोना निर्बंध अद्यापही अंशत: लागूच आहेत. सध्या जिल्ह्यात तीन स्तरावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. त्यात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिका स्तरावरून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे डोस सुरू आहे. मंगळवारी (ता. आठ) पर्यंत जिल्ह्यात केवळ २२ लाख ३९ हजार ७८५ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात दुसरा डोस घेणाऱ्या नागरीकांची संख्या अद्यापही अर्धवट अवस्थेच आहे. जिल्ह्यात आता पर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून १४ लाख ९० हजार ९३० लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात पहिला डोस घेणाऱ्याची संख्या ८ लाख १७ हजार ०६६ जणांचा समावेश आहे. तर ६ लाख ७३ हजार ८६४ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून २ लाख २६ हजार ६८८ लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर केवळ १ लाख ४६ हजार ३८७ लोकांनीच दुसरा डोस घेतला आहे. महापालिका स्तरावर आता पर्यंत २ लाख ४५ हजार

९५५ लोकांनी पहिला तर १ लाख २९ हजार ८२५ लोकांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. तीन ही स्तरावरील दुसरा डोस घेणाऱ्या लोकांची टक्केवारी केवळ ५८.०४ टक्के इतकी आहे. ही बाब जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. केवळ जाहिरात बाजी करून प्रशासन वेळ मारून नेताना दिसत आहे. प्रत्यक्षात लसीकरणाच्या कामात म्हणावे तसे गांभीर्य घेताना दिसत नाहीत.

असे होते उद्दिष्ट...

जिल्ह्यात तीन स्तरावरून करण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतू या उद्दिष्टाची पूर्ती अजूनही झालेली नाही. अत्यंत संथ गतीने हे काम सुरू असल्याने परभणी जिल्ह्यावर अद्यापही कोरोना निर्बंधाची टागंती तलवार आहेच. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दुसऱ्या डोसचे ११ लाख १९ हजार ६६ उद्दिष्ट होते. ते केवळ ६०.२२ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्हा शल्यचिकीत्सक कार्यालयाकडे २ लाख ४८ हजार ७३४ लोकांचे उद्दिष्ट होते. त्याचे ५८.८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. महापालिका स्तरावर २ लाख ६९ हजार २११ लोकांचे उद्दिष्ट होते ते ही केवळ ४८.२२ टक्केच साध्य झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT