औषध विक्रेते आंदोलनाच्या पावित्र्यात
------
केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १३ ः अन्न व औषध प्रशासनद्वारे राज्यातील औषध विक्रेत्यांविरुद्ध अतिशय छोट्या छोट्या चुकांसाठी तीव्र कारवाई सुरू केली असून, औषध विक्रेत्यांविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईविरोधात अपिल करण्यासाठी मिळणारा वेळ शून्य दिवसांवर आणून औषध विक्रेत्यांचा नैसर्गिक न्याय नाकारला जात आहे. त्यामुळे संघटनेस आंदोलनात्मक भूमिका घेणे भाग पडेल, असा इशारा जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी दिला.
अन्न व औषध प्रशासन अनेकदा छोट्या गुन्ह्यासाठी कारवाई करत असताना त्यापेक्षा गंभीर गुन्हे करणाऱ्या डॉक्टर्स, ऑनलाइन औषध विक्रेत्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. पत्रव्यवहार करूनदेखील प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शासनाने याबाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा राज्यातील विक्रेत्यांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. बंद पुकारणे, रोज फक्त आठ तास औषध दुकाने उघडी ठेवणे, अशा बाबींचा विचार आंदोलनात केला जाईल. कायदेशीर मार्गाने न्याय्य हक्कासाठी लढा देण्याचा इशारादेखील संघटनेचे राज्य अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव अनिल नावंदर यांनी दिल्याचे मंत्री यांनी प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.