छत्रपती संभाजीनगर

समस्या ऐकल्या नव्हे, उपाय सांगितले!

CD
समस्या ऐकल्या आणि उपायदेखील सांगितले! -- ‘पोलिस आपल्या गावामध्ये’ उपक्रमात २५ हजार नागरिकांशी संवाद --------- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १३ : ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना सुरक्षिततेबाबत जागरूक करणे तसेच गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने १ ऑक्टोबरपासून ‘पोलिस आपल्या गावामध्ये’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिस अधिकारी व अंमलदार प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. आतापर्यंत लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ५१६ गावांना भेटी देऊन तब्बल २४ हजार ९१७ नागरिकांशी संवाद साधला. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या अनुषंगाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर, पाणी बचत आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या सामाजिक संदेशाबरोबरच गावांमध्ये होणाऱ्या पशुधन चोरी, शेती अवजारे व मोटार चोरी यांसारख्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी, अवैध सावकारीचे दुष्परिणाम, सायबर फसवणुकीपासून बचाव तसेच विविध गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गावातील शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची भूमिका महत्त्वाची असून, गावातील सुशिक्षित व स्वच्छ चारित्र्याच्या युवकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व २३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून, पोलिस अधिकारी प्रत्यक्ष ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, तक्रारी व सूचना जाणून घेत आहेत. त्यामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील समन्वय व विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होत आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अन्य वरिष्ट अधिकाऱ्यांच्या समन्वयातून हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. -- समस्या, सूचना मांडण्याचे आवाहन ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करणे, गुन्हेगारीला प्रतिबंध करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात आपल्या समस्या व सूचना मांडाव्यात आणि गावाच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Winter Skincare Tips: हिवाळ्यात चेहरा काळपट पडू नये म्हणून काय करावं? त्वचेची चमक टिकवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स

IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'

Latest Marathi News Live Update: उदापूर येथे सुपर कॅरी गाडीची दुचाकीला धडक; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

India Export: भारताच्या निर्यातीत 30 टक्क्यांची मोठी झेप; ऑक्टोबरमध्ये 8.47 लाख कोटींची निर्यात, व्यापार तुटीतही घट

'आग ये सुंदरा...तुझा माझा गो शोभल जोडा' आगरी कोळी गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT