Raj Thackeray Sakal
छत्रपती संभाजीनगर

...अन्यथा कोर्टात जाऊ, औरंगाबादेतील राज यांच्या सभेसाठी मनसे आक्रमक

आगामी १ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे होणार आहे.

गणेश पिटेकर

औरंगाबाद : आगामी १ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे होणार आहे. त्यासाठी पक्षाचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वातावरण निर्मितीची तयार सुरु करण्यात आली आहे. मात्र औरंगाबादचे (Aurangabad) पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिलेली नाही. यावर मनसे (MNS) नेते प्रकाश महाजन यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. महाजन हे प्रसारमाध्यमांशी आज शुक्रवारी (ता.२२) बोलत होते. (Prakash Mahajan Says, Give Permission For Raj Thackeray Public Gathering in Aurangabad)

सभेच्या परवानगीसाठी आम्ही रितसर अर्ज केलेला आहे. आयुक्तांकडे भेटीची मागणी केली आहे. आम्हाला त्यांनी परवानगी दिली नाही. तर आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा प्रकाश महाजन यांनी दिला आहे. सभेला परवानगी दिले नाही तर कुठल्याही परिस्थितीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची १ मे रोजी सभा होणार आहे. यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही याच मैदानावर आपल्या सभा गाजवल्या होत्या. त्यामुळे राज यांची येथील सभेला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र पोलिस आयुक्तांनी अद्यापही सभेला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मनसे आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: महापालिकेसाठी शिंदे गट सक्रिय, लोकसभा मतदारसंघनिहाय नेत्यांवर जबाबदारी

Kolhapur Youth Clash : स्टेटस्‌वरून खुन्नस, दबा देंगे हर आवाज, जो उंची होगी...; महागडे कपडे, विनानंबर प्लेट दुचाकी..., कोल्हापूर पोलिसांची काय भूमिका?

सॉरी, आम्ही जग सोडतोय! चिठ्ठी लिहून महिलेनं ११ वर्षीय मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी; पती घरातच झोपलेला

Asia Women Hockey: भारत-चीनमध्ये अंतिम फेरीची लढत; आशिया करंडक महिला हॉकी, आज सामना

Nitesh Karale: नितेश कराळे मास्तरांना पवारांच्या भेटीला पोलिस सोडेना, मास्तरांकडून फोनाफोनी सुरू

SCROLL FOR NEXT