छत्रपती संभाजीनगर

धनंजय मुंडे माझा नेता नाही; आमदार प्रकाश सोळंकेच्या विधानामुळे राष्ट्रवादीत भूकंप

CD
रडत-पडत जिंकून कुणी बढाई मारू नये प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा, राष्ट्रवादीत अंतर्गत कुरघोडी सकाळ वृत्तसेवा बीड, ता. १३ ः जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेली खदखद आणि कुरघोडीचे राजकारण आता उघडपणे चव्हाट्यावर आले आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एका मुलाखतीत, धनंजय मुंडे माझा नेता नाही, असे विधान करत थेट मुंडेंवर निशाणा साधला आहे. या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांमधील दुरावा लपून राहिलेला नाही. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि मंत्रिपदाच्या वाटपावर भाष्य करताना सोळंके यांनी थेट आरोप केला की, १९८० पासून बीड जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रिपद राखीव ठेवल्यासारखे चालले आहे. धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या संबंधांवर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, मी त्यांच्या हाताखाली काम करावे असे नाही. मी त्यांच्या काकांसोबत (गोपीनाथराव मुंडे) काम केले आहे, ते माझे नेते होते. दिवंगत सुंदरराव सोळंके यांच्या वारशाखाली राजकारण करणारे आणि पाच वेळा आमदार असलेले प्रकाश सोळंके यांनी अशा प्रकारे थेट बंडखोरीचे निशाण फडकवल्याने जिल्ह्यात मोठा संघर्ष पेटला आहे. पक्ष पातळीवर सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी, स्थानिक नेत्यांमधील ही उघड दगडफेक आगामी काळात महायुतीसाठी मोठी डोकेदुखी ठरणार, हे निश्चित मानले जात आहे. ----- स्वतःची ताकद सिद्ध करावी राजकीय ताकदीवर बोट ठेवताना आमदार सोळंके यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली. ते म्हणाले, जिल्ह्यात मोठे व्हायचे असेल आणि नेतृत्व करायचे असेल, तर किमान दहा आमदार निवडून आणण्याची ताकद असली पाहिजे. निवडणुकीत रडत-पडत निसटता विजय मिळवून कुणीही बढाई मारू नये, आधी स्वतःची ताकद सिद्ध करावी लागते. ----- पंकजा मुंडेंच्या राजकीय ताकदीचे समर्थन मुलाखतीत बोलताना सोळंके यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय प्रवासावरही भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही त्यांना विधानपरिषद आणि कॅबिनेट मंत्रिपद का दिले गेले, याचे समर्थन त्यांनी केले. पंकजाताई केवळ गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत म्हणून नव्हे, तर त्यांच्या पाठीशी आजही भक्कम व्होट बँक उभी आहे. जिल्ह्याचा कानाकोपरा त्यांना मानतो, असेही सोळंके म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

Global Indian CEOs : जगातील २०० दिग्गज कंपन्यांच्या तिजोरीची चावी भारतीयांच्या हाती! 'या' २३६ जणांचे वर्चस्व, महाराष्ट्र देशात अव्वल!

Latest Marathi News Live Update: एसबीआयच्या ग्लोबल आयटी सेंटरवर सायबर हल्ला

भीषण अपघात! बस कंटेनर ट्रकवर आदळली; २३ प्रवाशांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

Drought Relief: दुष्काळात शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत, भूमिहीन मजुरांचे काय? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काय दिले निर्देश?

SCROLL FOR NEXT