crime
crime  sakal
छत्रपती संभाजीनगर

मुलीचे अंघोळीचे व्हिडिओ काढणारा कारागृहात

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अंघोळ करताना अल्पवयीन मुलीचे फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला फुलंब्री पोलिसांनी शनिवारी (ता. २२) रात्री अटक केली. अविनाश कमळाजी हरणे (वय २२, जि. औरंगाबाद) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्‍याची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.आर. कुरेशी यांनी रविवारी (ता. २३) दिले.

प्रकरणात १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता ही मावशीकडे राहते. २२ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्‍या सुमारास पीडिता अंघोळ करताना आरोपीने बाथरुमच्‍या खिडकीतून फोटो अथवा शुटींग केल्याचे उघड झाले. पीडितेच्‍या मावशीने आरोपीला रंगेहाथ पकडले व आरोपीचा मोबाईल हिसकावून घेतला, त्यावेळी शिवीगाळ करून जीवे मारण्‍याची धमकी दिली. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

Water Storage : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT