Aurangabad sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : सिगारेटच्या झुरक्यांनी डिझेल थोडीच पेटते!

एका खासगी ट्रॅव्हल्समध्ये बकेटमधून डिझेल टाकताना, सिगारेटचे झुरके ओढणाऱ्या चालकाचा बेजबाबदारपणा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : नाशिकजवळ अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल्स पेटल्याने अकरा प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला. ही घटना ताजी असतानाच शनिवारी माळीवाडा येथे एका खासगी ट्रॅव्हल्समध्ये बकेटमधून आणलेले डिझेल टाकताना, सिगारेटचे झुरके ओढणाऱ्या चालकाचा बेजबाबदारपणा समोर आला. याचा जाब विचारणाऱ्या जागरूक नागरिकालाच उलट ‘सिगारेटच्या झुरक्याने डिझेल थोडीच पेट घेते...! असे उत्तर देत निष्काळजी चालकाने काढता पाय घेतला.

ट्रॅव्हल्समधून दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक सुरू असते. मात्र, ट्रॅव्हल्सचालकांचा आणि मालकांचा बेजबाबदारपणा वारंवार समोर येत असतो. नाशिकमध्ये ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. ही घटना ताजी असतानाच शनिवारी (ता. आठ) सकाळी माळीवाडा बसस्थाकाजवळ एक खासगी बस (एमएच-२०, डीडी-०५२८) डिझेल संपल्याने थांबलेली होती.

क्लीनरने बकेटमधून डिझेल आणले. ते डिझेल प्लॅस्टिकच्या अर्धवट कापलेल्या बाटलीने वाहनाच्या टाकीत तो ओतत होता. हा प्रकार सुरु असताना चालक बाजूलाच सिगारेटचे झुरकेही मारत होता. हा प्रकार त्या परिसरातील रहिवासी नरेंद्र बहाळस्कर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेचे चित्रीकरण केले व चालकाला जाब विचारला, त्यावेळी डिझेल पेटत नाही, पेटण्यासाठी ते काही पेट्रोल आहे का? असे उद्धट उत्तर त्याने दिले.

खासगी ट्रॅव्हल्सचा बसचालक बादलीने डिझेल भरत होता. विशेष म्हणजे चालक सिगारेट ओढत असल्याने भडका होऊन वाहनाने पेट घेतला असता तर मोठा अनर्थ झाला असता.

नरेंद्र बहाळस्कर, जागरूक नागरिक

बेजबाबदार खासगी ट्रॅव्हल्स बसची माहिती मिळाल्यानंतर ती बस जालना आरटीओ कार्यालयाने जप्त केली आहे. या वाहनचालकाचा परवाना आणि वाहनाचे परमिट निलंबित केले जाणार आहे.

- संजय मैत्रेवार, प्र. प्रादेशिक परिवहन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Latest Maharashtra News Live Updates: गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नाशिककरांना सतर्कतेचा इशारा

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

Ashadhi Wari 2025: विठूनामाने ‘प्रवरा संकुल’चे मैदान दुमदुमले; अश्‍वरिंगण सोहळा उत्साहात, १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Raju Shetti: शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे नको: राजू शेट्टी; 'शक्तिपीठ'मुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार

SCROLL FOR NEXT