नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचा आयुक्तांकडून आढावा
आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता.१३ : आयुक्त, शहरी आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान डॉ. सुनील भोकरे यांनी शुक्रवारी (ता.१३) पाथरी तालुक्यातील बाबा कॉलनी येथील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रास भेट दिली. यावेळी केंद्राच्या कामकाजाचा तसेच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान त्यांनी आरोग्यवर्धिनी केंद्रातील विविध आरोग्य सेवा, आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, उपलब्ध मनुष्यबळ, प्रयोगशाळा तपासणी सुविधा, औषधसाठा, अहवाल व अभिलेख नोंदणी यांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्ययावत माहिती घेतली. महिलांची नियमित आरोग्य तपासणी, माता व बाल आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला रुग्णकेंद्रित दृष्टिकोनातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. शहरी भागातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणे आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने ही क्षेत्रीय भेट घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, सहायक संचालक कुष्ठरोग तथा शहरी आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख काजी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल पुजारी, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ. संतोष गुंजकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अमित बिडवे, तालुका विस्तार अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.