छत्रपती संभाजीनगर

सुरांच्या मैफलीतून ''पुनश्च हरिः ओम''चा स्नेहगंध दरवळला!

CD
सुरांच्या मैफलीतून `पुनश्च हरिः ओम''चा स्नेहबंध दरवळला! अनुराधाताई नांदेडकर यांना संगीत साधनांची अनोखी दिवाळी भेट; गायक व संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग हिंगोली : दिवाळीचा आनंद संगीताच्या सुरांनी द्विगुणित करत हिंगोलीतील गायक आणि संगीतप्रेमींनी पुनश्च हरिः ओम या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून अनोखा उपक्रम राबविला. संगीत साधना विद्यालयाच्या संस्थापिका, गायिका आणि संगीत शिक्षिका अनुराधाताई नांदेडकर यांना संगीत साधनांची अनोखी दिवाळी भेट देऊन त्यांच्या संगीत साधनेप्रती असलेल्या योगदानाचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनादी मी, अनंत मी या अजरामर गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी संगीत साधना विद्यालयाचे विद्यार्थी कुशल यंबल, अमृता भालेराव आणि ज्योत्स्ना लखमवार यांनी ‘कराओके’च्या माध्यमातून विविध गीते सादर केली. नव्या संगीत साधनांच्या साथीने सादर झालेल्या सुरेल गीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. या उपक्रमासाठी सतीश विडोळकर, लक्ष्मीकांत शिरडकर, नितीन कामतीकर, नंदकिशोर भालेराव, संजय घवाड, संतोष डोईफोडे, नितीन बेले, अमृता भालेराव, ज्योत्स्ना लखमवार यांनी पुढाकार घेतला. डॉ. किसन लखमवार, डॉ. जवळेकर, डॉ. संजय नाकाडे आणि कैलास असेगावकर यांचेही योगदान लाभले. महेश पेंडके यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी डॉ. गोविंद भालेराव, शैलेश नांदेडकर यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: शेवटच्या वनडेत खेळणार नाही मॅट हेन्री, विराट कोहलीने जर्सी भेटही दिली; पण कारण काय?

आयुष्मान कार्डधारकांना धक्का! आता ११२ आजारांवरील उपचार खासगी रुग्णालयांत होणार नाहीत, मोदी सरकारचा प्रस्ताव

Maharashtra Tourism: गोव्याच्या गर्दीपासून दूर, कोकणात आहे समुद्राचं हे सुंदर जग! एका बोटसफारीतून पाहता येतात १ नाही तर १२ ठिकाणं

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

SCROLL FOR NEXT