Python Sakal
छत्रपती संभाजीनगर

चिकलठाणा धावपट्टीवर भलामोठा अजगर

औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर शुक्रवारी (ता. १) रात्री सव्वा दहा वाजता पर्यवेक्षक मंगेळ साळवे हे पाहणी करत असताना त्यांना धावपट्टीवर अजगर दिसून आला.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर शुक्रवारी (ता. १) रात्री सव्वा दहा वाजता पर्यवेक्षक मंगेळ साळवे हे पाहणी करत असताना त्यांना धावपट्टीवर अजगर दिसून आला.

औरंगाबाद - एखादा साप (Snake) दिसला तरी, अनेकांची भंबेरी उडते. पळताभूई थोडी होते. वेळ रात्रीची असल्यास वातावरण आणखीनच टाईट असते. चिकलठाणा विमानतळाचे (Chikalthana Airport) पर्यवेक्षक मंगेश साळवे यांना असाच काहीसा अनुभव आला. धावपट्टीवर भलामोठा अजगर (Python) दिसला. याचवेळी प्रसंगावधान राखत सर्पमित्रांना बोलावून घेतले. त्यानंतर अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर शुक्रवारी (ता. १) रात्री सव्वा दहा वाजता पर्यवेक्षक मंगेळ साळवे हे पाहणी करत असताना त्यांना धावपट्टीवर अजगर दिसून आला. त्यांनी तत्काळ एटीसी इन्चार्ज मॅनेजर विनायक कटके यांना ही बाब कळविली. सर्पमित्र नितेश जाधव, पुष्पा शिंदे, शरद दाभाडे यांना बोलावून घेण्यात आले. तब्बल दहा फुट लांबीचा अजगर पकडण्यासाठी सर्पमित्रांना तब्बल एक तास लागला.

अजगर हा शेड्युल वन मध्ये गणला जाणारा साप आहे. आधीच त्याच्या प्रजाती कमी होत असताना विनायक कटके यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. अजगराला पकडल्यानंतर डॉ. किशोर पाठक यांच्या निगरानीत त्याला रात्रभर ठेवण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या संमतीने शनिवारी (ता. २) सकाळी अजगराला सारोळा जंगलात सोडण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepak Pawar: मराठी माणूस मुस्लिमांचा अकारण राग करतो, पण जैन लोकांची मुजोरी...; दीपक पवारांचं सूचक वक्तव्य, काय म्हणाले?

Free Bus Travel for Women: रक्षाबंधनाच्या दिवशी ‘या’ राज्यांमध्ये महिलांना बस प्रवास मोफत असणार

भारताला मोठा धक्का! रिषभ पंत Asia Cup 2025 स्पर्धेला मुकणार; वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता

Latest Maharashtra News Updates: वर्गमित्राने भरदिवसा आठवीच्या विद्यार्थ्यावर केले धारदार शस्त्राने वार

Manchar News : अवसरी खुर्द येथील गंगोत्रीतील २४ यात्रेकरू सुखरूप! मुख्याध्यापक विठ्ठल खेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल; नातेवाईकांना दिलासा

SCROLL FOR NEXT