छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादच्या ऐतिहासिक जामा मशिदीत क्वारंटाईन सेंटर

शेखलाल शेख


औरंगाबादः शहरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासमोर उपचार आणि रुग्णांना ठेवण्याचे मोठे आवाहन आहे. यामध्ये महापालिकेकडून विविध प्रयत्न केले जात असताना ऐतिहासिक जामा मशिदीतील काशिफूल उलुम मदरशात १०० बेडचे सुसज्ज क्वारंटाइन सेंटर तयार करण्यात आले आहे.

येथे रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरची शनिवार (ता.२०) जूनपासून सुरवात झाल्याची माहिती अब्दुल कदीर मौलाना यांनी दिली.

क्वारंटाइन सेंटर सुरू झाल्यानंतर रुग्णांच्या संपर्कात आलेले ३४ जण सध्या येथे राहत आहे. या सर्वांची येथे राहण्या-खाण्याची चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. मागील महिन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथील सुविधांची पाहणी केली होती. येथे तीन दिवसांपूर्वी क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात आले आहे.

या सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण राहणार नाही. येथे सेंटर सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल कदीर मौलाना यांनी पुढाकार घेतला होता. अब्दुल कदीर मौलाना, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, मदरसा कमेटीचे अध्यक्ष अब्दुल जब्बार बागवान, जामा मशीदचे इमाम हाफीज जाकीर, सेक्रेटरी मो. रिझवान खान, असलम खान, मौलाना नसिमुद्दीन मिफ्ताई, सय्यद मतीन, अशफाक कुरेशी, जफर बिल्डर, सलीम अंबानी तसेच महापालिकेचे अधिकारी यांची उपस्थिती होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT