छत्रपती संभाजीनगर

श्वानदंश प्रतिबंधासाठी उमरीत जनजागृती मोहीम

CD
उमरीत श्वानदंश प्रतिबंध व जनजागृती मोहीम --- ‘रेबीज मुक्ती मिशन २०३०’ अंतर्गत उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा उपक्रम --- नांदेड, ता. १८ : श्वानदंशाच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि रेबीजविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे उमरी येथील के. डी. बॉस येथे श्वानदंश प्रतिबंध व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष ॲड. दगडू लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेबीज मुक्ती मिशन २०३०’ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान श्वानदंश टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी, भटक्या श्वानांशी सुरक्षितपणे वागण्याची पद्धत आणि श्वानदंश झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मानव आणि प्राणी यांच्यात सुरक्षित सहअस्तित्व निर्माण करण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. श्वानदंश झाल्यास जखम साबण आणि वाहत्या पाण्याने किमान १५ मिनिटे धुऊन तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. रेबीजचा धोका टाळण्यासाठी वेळेत उपचार घेणे महत्त्वाचे असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमाला उमरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि एनडीसी बँकेचे संचालक कैलास भाऊ देशमुख गोरटेकर, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष प्रवीण सरडा, नगरसेवक साईनाथ दादा जमदारे, नगर परिषद गटनेते राजेश जाधव, गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रवक्ते डॉ. शुभम सूर्यवंशी, सदाशिव मंत्रीवाड आणि रोहित सामलवार यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

Spinal Pain: पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठी कोणत्या कुशीवर झोपणे योग्य? पाठ टेकून झोपण्याचेही आहेत फायदे!

2026 च्या शेवटच्या 3 महिन्यांची बाबा वेंगांची भविष्य वाणी व्हायरल; ‘या’ राशींबाबत चर्चांना उधाण!

Latest Marathi News Live Update : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.७४ टक्के मतदान; ५,४०४ मतदारांचा सहभाग

SCROLL FOR NEXT