rajesh tope aurangabad
rajesh tope aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

आरोग्याचे रेंगाळलेले प्रकल्प फास्ट ट्रॅक वर आणू : राजेश टोपे 

योगेश पायघन

औरंगाबाद- आरोग्यवर्धिनी योजनेअंतर्गत प्रत्येक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात डॉक्‍टर असेल. शासकीय रुग्णालयांत डॉक्‍टर, परिचारिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची रिक्त पदे भरणे, मंजूर सुविधांसाठी निधी देणे, यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देऊ. शिवाय आरोग्याचे मंजूर असलेले; पण रेंगाळलेल्या प्रकल्पांना फास्ट ट्रॅकवर आणू, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता. 23) पत्रकार परिषदेत दिली.

चिकलण्याचे जिल्हा रुग्णालय व दूध डेअरीच्या जागेवर मंजूर असलेल्या 200 खाटांच्या महिला व बालरुग्णालयाच्या रेंगाळलेल्या कामांना प्राधान्यक्रम दिला जाईल. औरंगाबादसाठी ज्या ज्या गोष्टी मंजूर झालेल्या आहेत, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. डॉक्‍टर, कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील. घाटी रुग्णालयात संपूर्ण मराठवाड्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. जिल्हा रुग्णालय, महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या माध्यमातून घाटी रुग्णालयावरील भार कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच महिला व नवजात शिशू रुग्णालयाचे लवकरच भूमिपूजन करू. असे श्री. टोपे यांनी सांगितले. 

उघडून तर बघा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी? 

डीएचओ, सीएसने लक्ष द्यावे 
ग्रामीण भागातील नियुक्त डॉक्‍टर त्या आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी योग्य सेवा देतील ते संबंधित अधिकाऱ्यांनी पाहिले पाहिजे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यावर लक्ष ठेवावे. सोबतच आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्‍टरांवर सक्त कारवाई केली जाईल. प्रसंगी त्यांना तुरुंगातही टाकू. आरोग्य विभागातील मेडिकल व पॅरामेडिकलच्या रिक्त जागा भरण्याचे धोरण निश्‍चित केले जाईल, असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT