Chhatrapati Sambhajinagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; विभागप्रमुखांच्या अहवालानंतर कारवाई

महापालिकेचा या कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी होऊन दर महिन्याला ३५ लाखाची बचत होणार

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या २०९ कर्मचाऱ्यांना विभागप्रमुखांच्या अहवालाच्या आधारे कामावरून कमी करण्यात आले आहे. यामुळे महापालिकेचा या कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी होऊन दर महिन्याला ३५ लाखाची बचत होणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले.

महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी विविध विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. त्यानंतर जिथे गरज आहे तिथे कर्मचारी ठेवून गरजेपेक्षा जास्त असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार त्यांनी सर्व विभागप्रमुखांकडून अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा अहवाल मागविला होता. स्मार्ट सिटी कार्यालयात विभागप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विभागप्रमुखांनी अतिरिक्त ठरणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अहवाल सादर केला.

या अहवालाच्या आधारे २०९ कंत्राटी कर्मचारी, वसुली कर्मचारी व संगणक ऑपरेटर यांची अनावश्यक भरती केल्याचे दिसून आल्याने महापालिका प्रशासकांनी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले. तसेच या अतिरिक्त ठरलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनावर होणाऱ्या ३५ लाख रुपयांच्या खर्चाची बचत होणार आहे.

त्यांचीही परीक्षा घेतली जाणार

महापालिका प्रशासकांनी केलेल्या पाहणीत महापालिकेच्या नियमित सेवेत असलेल्या विविध विभागातील लिपिकांना संगणकावर टायपिंग करता येत नसल्याचे निदर्शनास आले. लिपिक पदावर नियमित सेवेत असूनदेखील त्यांना टायपिंग येत नसल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले होते.

अशा लिपिकांना आता टायपिंग शिकण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. महिनाभरात टायपिंग शिकल्यानंतर त्यांचीही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्याबद्दलही निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT